शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

हाँगकाँगची टीन लाऊ उपांत्य फेरीत

By admin | Updated: July 22, 2016 21:56 IST

महाराष्ट्राच्या आर्या ओगळे हिने दिलेली कडवी झुंज हाँगकाँगची अव्वल मानांकीत टीन यान लाऊ विरुध्द अपयशी ठरल्याने तीला एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर खुल्या स्क्वॉश

इंडियन ज्यु. स्क्वॉश : महाराष्ट्राच्या आर्याची अपयशी झुंज

मुंबई : महाराष्ट्राच्या आर्या ओगळे हिने दिलेली कडवी झुंज हाँगकाँगची अव्वल मानांकीत टीन यान लाऊ विरुध्द अपयशी ठरल्याने तीला एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. मुलींच्या १५ वर्षांखालील गटात झालेल्या या लढतीत आर्याने टीनला २-३ असे झुंजवले. त्याचवेळी महाराष्ट्राचा अग्रमानांकीत तुषार शहानी याने महाराष्ट्राच्याच ॠत्विक राऊला नमवून मुलांच्या १७वर्षांखालील गटाची उपांत्य फेरी गाठली.वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आर्याने पहिला गेम जिंकून आश्चर्यकारक सुरुवात करताना टीनला दबावाखाली ठेवले. यानंतर टीनने पुनरागमन करताना बरोबरी साधली. तर तिसरा गेम जिंकताना आर्याने २-१ अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर टीनने आपला दर्जा सिध्द करताना सलग दोन गेम जिंकताना अर्याची झुंज ९-११, ११-६, ९-११, ११-४, ११-८ अशी मोडली. तसेच पाच गेमपर्यंत रंगलेल्या अन्य चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अवनी नगर हिने धक्कादायक निकाल नोंदवताना द्वितीय मानांकीत तामिळनाडूच्या समिता एस. हिचे आव्हान ११-६, ८-११, १२-१०, ६-११, ११-८ असे संपुष्टात आणले.मुलांच्या १७ वर्षांखालील गटात अव्वल खेळाडू तुषारने अपेक्षित कामगिरी ॠत्विकचा ११-२, ११-९, ११-९ असा पराभव करुन दिमाखात उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राचा अन्य एक कसलेला खेळाडू वीर छोत्रानी याने देखील सहजपणे उपांत्य फेरी निश्चित करताना दिल्लीच्या गौतम नागपालला ११-७, ११-८, ८-११, ११-४ असे नमवले. मुलींच्या १७ वर्षांखालील गटामध्ये महाराष्ट्राच्या नवमी शर्माने आक्रमक खेळाच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या नंदिका कुमारला ११-५, ११-६, ११-५ असे लोळवले. तर अव्वल मानांकीत तामिळनाडूच्या अशिता भेंग्रा हिने गोव्याच्या स्पर्शी मट्टासचा सरळ तीन गेममध्ये ११-४, ११-३, ११-२ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)