शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

होल्डन, बार्टलेटची नाबाद शतके

By admin | Updated: February 14, 2017 00:12 IST

कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बार्टलेटच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने १९ वर्षांखालील युवकांच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर

नागपूर : कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बार्टलेटच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने १९ वर्षांखालील युवकांच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर १ बाद ३११ अशी भक्कम धावसंख्या उभारली. भारतीय युवा संघाचा मारा निष्फळ ठरला. मॅक्स होल्डन १३५ धावा (२५९ चेंडू, १७ चौकार) आणि जॉर्ज बार्टलेट १३२ धावा (२०३ चेंडू, १८ चौकार, २ षट्कार) करून खेळपट्टीवर कायम आहेत.जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवरील सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॅक्स होल्डनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हॅरी ब्रुक आणि मॅक्स होल्डनने ५७ धावांची भागीदारी केल्यानंतर मध्यमगती गोलंदाज कनिश सेठच्या चेंडूवर ब्रुकला (२१) यष्टिरक्षक लोकेश्वरने झेलबाद केले. हा अपवाद वगळता भारतीयांची दिवसभर निराशाच झाली. होल्डनने उपाहारानंतर अर्धशतक पूर्ण केले. भारताचा कर्णधार जाँटी सिद्धूसह सात गोलंदाजांनी मारा केला, पण यश मात्र कोणत्याच गोलंदाजाला मिळवता आले नाही.बार्टलेटही अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. उपाहार ते चहापान या दोन तासांत दोघांनी शतकी भागीदारी केली. सलामीवीर होल्डनने लवकरच १९२ चेंडूंत १३ चौकारांसह शतक गाठले. होल्डननंतर बार्टलेट शतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. त्याने १६७ चेंडूचा सामना करीत १४ चौकार व एका षट्कारासह शतक गाठले. नंतर दोघांनीही ३३६ चेंडंूत दुसऱ्या गड्यासाठी २५४ धावांची भागीदारी करीत ३०० धावा फळ्यावर लावल्या. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलकइंग्लंड (पहिला डाव) : हॅरी ब्रुक झे. लोकेश्वर गो. कनिश सेठ २१, मॅक्स होल्डन खेळत आहे १३५, जॉर्ज बार्टलेट खेळत आहे १३२. अवांतर-२३, एकूण- ८७ षटकांत १ बाद ३११. गडी बाद होण्याचा क्रम : १-५७. गोलंदाजी : कनिश सेठ १७-४-५०-१, रिषभ भगत १९-२-५१-०, विनीत पन्वर ११-०-५६-०, सिजोमन जोसेफ १३-१-५४-०, डॅरिल फेरारिओ १४-३-५०-०, सौरभ सिंग ८-१-२३-०, जाँटी सिद्धू ५-०-१७-०.