शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

होल्डरचा पंच! अटीतटीच्या लढतीत भारत पराभूत

By admin | Updated: July 3, 2017 02:50 IST

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला.

ऑनलाइन लोकमतनॉर्थ साऊंड (अँटिग्वा), दि. 3 - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे दिग्गज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले. पाच बळी टिपणारा कर्णधार जेसन होल्डर वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आपली पिछाडी 1-2 अशी कमी केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन 5, विराट कोहली 3 आणि दिनेश कार्तिक 2 हे झटपट माघारी परतल्याने तेराव्या षटकात भारताची अवस्था 3 बाद 47 अशी झाली होती. मात्र सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मात्र रहाणे (60) आणि धोनी ( 54) यांचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. धोनीने शेवटपर्यंत खिंड लढवून भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण 49 व्या षटकात धोनी बाद झाल्यावर भारताचे सामन्यातील आव्हान संपुष्टात आले. तत्पूर्वी चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर उमेश यादवसह इतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजला 9 बाद 189 धावांत रोखले. उमेश यादव (३६ धावांत ३ बळी), हार्दिक पांड्या (४० धावांत ३ बळी) आणि कुलदीप यादव (३१ धावांत २ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर यजमान संघाचा एकही फलंदाज टिकून खेळू शकला नाही. त्यांच्याकडून सलामीवीर एव्हिन लुईस आणि काइल होप यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३५ धावा केल्या, तर शाई होप (२५) आणि रोस्टन चेज (२४) यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. काइल आणि लुईस यांनी संघाला संथ; परंतु चांगली सुरुवात करून दिली. अखेर हार्दिक पांड्या याने होपला स्वीपर कव्हरला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीप यादवने लुईसला विराटकरवी झेलबाद करीत भारताला दुसरे यश मिळवून दिले. गेल्या सामन्याप्रमाणेच कुलदीपने याही सामन्यात रोस्टन चेजला त्रिफळाबाद केले. पांड्याने शाई होप याला धोनीकरवी झेलबाद करीत वेस्ट इंडीजला चौथा धक्का दिला. कर्णधार जेसन होल्डरदेखील १० चेंडूंत ११ धावा केल्यानंतर उमेशच्या गोलंदाजीवर धोनीच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्यामुळे वेस्ट इंडीजची ५ बाद १५४ अशी स्थिती झाली. या पडझडीतून वेस्ट इंडीजचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. वेस्ट इंडीजला अखेरच्या १० षटकांत अवघ्या ३५ धावाच केल्या.