शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी : सिनियर्स हरले, ज्युनियर्स जिंकले

By admin | Updated: July 29, 2016 19:09 IST

आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या स्पेन संघाकडून दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय सिनियर्स हॉकी संघाला ३-२ ने पराभव पत्करावा लागताच रिओ आॅलिम्पिकच्या तयारीला धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमत

माद्रिद, दि. २९ : आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या स्पेन संघाकडून दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय सिनियर्स हॉकी संघाला ३-२ ने पराभव पत्करावा लागताच रिओ आॅलिम्पिकच्या तयारीला धक्का बसला आहे. विश्व क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने ही मालिका ०-२ ने गमविली. ११ व्या स्थानावर असलेल्या स्पेनने पहिला सामना ४-१ ने जिंकला होता.

आठ वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन भारतीय हॉकी संघाला येथून थेट रिओला जायचे आहे. भारताने अखेरचे सुवर्ण १९८० च्या मॉस्को आॅलिम्पिकमध्ये जिंकले होते. भारताकडून दुसऱ्या सामन्यात मनप्रितने ३८ व्या आणि रमणदीपने ५८ व्यामिनिटाला गोल केला. स्पेनकडून जोसेफ रोमेयू २० व्या, पाऊ किमाडा ४२ व्याआणि सॅल्व्हाडोर पियरा याने ५३ व्या मिनिटाला गोल नोंदविला.

रोमेयूने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित आघाडी मिळवून दिली होती पण मनप्रितच्या गोलमुळे भारताने बरोबरी साधली. चार मिनिटानंतर स्पेनसाठी किमाडा याने गोल नोंदवित पुन्हा आघाडी मिळवून दिली. स्पेनकडून पियरा याने ५३ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. चार मिनिटानंतर रमणदीप याने गोल केला. पण तोवर सामना हातून निघून गेला होता. या गोलमुळे केवळ पराभवाचे अंतर कमी झाले.अजय यादव आणि वरुण कुमार यांच्या प्रत्येकी दोन गोलमुळे भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने इंग्लंडला ७-१ ने सहज पराभूत केले. अजयने २७ आणि ४३ तसेच वरुणने ३२ आणि ३५ व्या मिनिटांना प्रत्येकी दोन गोल केले. मनप्रितने १५व्या, गुरजतसिंगने ३८ आणि सिमरनजीतसिंग याने ४० व्या मिनिटाला प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले.

इंग्लंडचा एकमेव गोल एड होल्डरने केला.भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत सातत्याने चेंडूवर नियंत्रण राखले. याचा लाभ मनप्रितला मिळाला. इंग्लंडला लगेचच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर होल्डरने गोल नोंदवित इंग्लंडला बरोबरी साधून दिली. यानंतर इंग्लंड संघ दडपणाखाली खेळला. भारतासाठी गुरजंतच्या क्रॉसवर अजयने दुसरा गोल केला. वरुणने यानंतर आणखी दोन गोल करताच मध्यांतरापर्यंत भारताची आघाडी ४-१ अशी झाली होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी आणखी तीन गोल करीत मोठ्या फरकाने विजय साजरा केला.