शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी : जर्मनीकडून भारत पराभूत

By admin | Updated: June 7, 2017 00:46 IST

गेल्या लढतीत बेल्जियमचा पराभव करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले.

डसेलडोर्फ : गेल्या लढतीत बेल्जियमचा पराभव करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तीन देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला मंगळवारी यजमान जर्मनीविरुद्ध ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला. जर्मनीने यापूर्वीच्या लढतीत बेल्जियमचा २-१ ने पराभव केला होता, तर भारताला २-२ ने बरोबरीत रोखले होते. पहिल्या लढतीत जर्मनीला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला होता. जर्मनीच्या खात्यावर ७ गुण आहेत, तर भारताच्या खात्यावर ४ गुणांची नोंद आहे. भारताला पहिल्या लढतीत बेल्जियमने पराभूत केले, तर जर्मनीविरुद्धची दुसरी लढत बरोबरीत संपली. गेल्या लढतीत भारताने बेल्जियमचा पराभव केला. भारताने आजच्या लढतीत चांगली सुरुवात करताना दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. युवा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगला गोल नोंदविता आला नाही. सोमवारी बेल्जियमविरुद्ध ३-२ ने विजयात त्याने दोन गोल नोंदवले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये रिओ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनी संघाने आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला थियेस ओले प्रिंजने जर्मनीचे खाते उघडले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरच्या क्षणी जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारतीय गोलकीपर आकाश चिकटेने अप्रतिम बचाव करीत त्यांचे गोल नोंदवण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये संयमी खेळ करीत प्रतिस्पर्धी संघाला विशेष संधी दिली नाही. भारताला २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोलची नोंद झाली नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोलची नोंद झाली नाही. त्यानंतर जर्मनीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. अखेरच्या क्षणाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्याची संधी होती. पण हरमनप्रीतच्या ड्रॅग फ्लिकवर जर्मनीच्या गोलकीपरने चांगला बचाव केला. भारताने अतिरिक्त फॉरवर्ड खेळविण्यासाठी गोलकीपर हटविण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा काही लाभ झाला नाही. जर्मनीने ६० व्या मिनिटाला टीम हर्जब्रशने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर २-० ने विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)