ऑनलाइन लोकमतरिओ, दि. ५ : आॅलिम्पिकपूर्वी दमदार कामगिरी करीत उत्साही झालेल्या पुरुष हॉकी संघाला आॅलिम्पिक मोहिमेची यशस्वी सुरुवात करीत ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपविण्याची अपेक्षा आहे.
आठ वेळेचा सुवर्ण विजेता भारतीय संघ १९८० साली मॉस्कोत अखेरचे सुवर्ण जिंकू शकला होता. तेव्हापासून पदकाचा दुष्काळ कायम असून बीजिंगमध्ये हॉकी संघाला जागा मिळृू शकली नव्हती तर मागच्या लंडन आॅलिम्पिकमध्ये हा संघ तळाच्या स्थानावर होता. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत रौप्य पदकाची कमाई करीत भारताने पात्रता गाठली. श्रीजेशच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध होईल.
महिला संघाने ३६ वर्षानंतर पात्रता मिळविली आहे. मॉस्को येथे १९८० साली महिला संघ खेळला होता. भारताची पहिली लढत जपानविरुद्ध होणार आहे. जपानला भारताने विश्व हॉकी लीगमध्ये पराभूत करीत पात्रता गाठली हे विशेष. भारतीय पुरुष संघाला गतविजेता जर्मनी, उपविजेता नेदरलँन्ड,कॅनडा आणि अर्जेंटिना यांच्या गटात स्थान मिळाल्याने प्रत्येक सामना जिंकणे गरजेचेराहील. श्रीजेश हा विश्वदर्जाचा गोलकिपर असून मधली फळी आणि बचावफळीदेखील उत्तम आहे. भारत एक विजय आणि एक ड्रॉसह उपांत्यपूर्व फेरी गाठू शकतो. दुसरीकडे जर्मनी, ब्रिटन किंवा नेदरलॅन्डला नमविल्यास उपांत्य फेरीत भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागणार नाही आयर्लंड पहिल्यांदा आॅलिम्पिक खेळत आहे.
विश्व लीगमध्ये या संघाने पाकिस्तान आणि मलेशियाला पराभूत केले होते. भारताच्या आक्रमणाची धुरा सरदारासिंग आणि एस. व्ही. सुनील यांच्या खांद्यावर राहील. बचावफळीत व्ही. आर. रघुनाथ, कोथाजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग हे आहेत. रोलॅन्ट ओल्टमन्स हे वर्तमानात जगणारे कोच आहेत. ते म्हणाले, भूतकाळात काय घडले हे मला माहीत नाही, पण यंदा चांगल्या कामगिरीची मला आशा आहे. खेळाडूंवर मात्र दडपण आणणार नाही. आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही, याची मी वारंवार खेळाडूंना कल्पना देतो.१३ व्या स्थानावर असलेला भारतीय हॉकी संघ आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळाल्यापासून उत्साही आहे. या संघाचे नेतृत्व ऐनवेळी बदलण्यात आले आहे. रितूराणीऐवजी सुशीला चानू हिच्याकडे संघाची धुरा सोपविण्यात आली.भारतीय हॉकी संघ पुरुष : पी. आर. श्रीजेश (कर्णधार व गोलकिपर) बचाव फळी :व्ही. आर. रघुनाथ, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीतसिंग, मधली फळी : दानिश मुस्तफा, के. चिंग्लेनसानसिंग,, मनप्रीतसिंग, सरदारासिंग, एस .के. उथप्पा, देवेंद्र वाल्मीकि. आक्रमक फळी : एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, रमनदीप्सिंग, निकिन थिमय्या, रुपिंदरपालसिंग, विकास दहिया, प्रदीप मोर
महिला संघ : सविता(गोलकिपर), बचाव फळी : सुशीला चानू (कर्णधार), दीपग्रेस इक्का, दीपिका, नमिता टोप्पो, सुनीता लाकडा मिडफील्डर : नवजोत कौर,मोनिका, रेणुका यादव, लिलिमा मिंज आक्रमक फळी : निक्की प्रधान, अनुराधादेवी, पूनम रानी, वंदना कटारिया, राणी रामपाल, प्रीती दुबे, रजनी ई, एचलाल रुआत फेली.