शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

By admin | Updated: July 31, 2016 05:40 IST

लक्षण संदाकन याने तीन बळी घेताच श्रीलंकेने आॅस्ट्रेलियावरील १७ वर्षांचा कसोटी विजयाचा दुष्काळ संपविला.

पल्लिकल : फिरकीपटू रंगाना हेराथने अर्धा संघ गारद केल्यानंतर पदार्पण करणारा लक्षण संदाकन याने तीन बळी घेताच श्रीलंकेने आॅस्ट्रेलियावरील १७ वर्षांचा कसोटी विजयाचा दुष्काळ संपविला. शनिवारी पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी यजमान संघाने पाहुण्यांवर १०६ धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.लंकेसाठी हा केवळ कसोटी विजय नव्हता. तब्बल १७ वर्षांनंतर त्यांना हा विजय साकार करता आला. याआधी सप्टेंबर १९९९ मध्ये कॅण्डी कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध लंकेने विजय मिळविला होता. या विजयासह लंकेने आॅस्ट्रेलियावर केवळ दुसऱ्या विजयाची नोंद केली. दहा सामने लंकेने गमाविले, तर दोन सामने अनिर्णीत राहिले. पावसाच्या व्यत्ययात लंकेने आॅस्ट्रेलियापुढे २६६ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले होते. यजमान संघ दुसऱ्या डावात ८८.३ षटकांत १६१ धावांत गारद झाला. लंकेच्या माऱ्यापुढे आॅस्ट्रेलियाचे फलंदाज नांगी टाकताना दिसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने ५५ धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. लंकेच्या खेळाडूंनी सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी बजावली. आॅस्ट्रेलियाला गुंडाळण्याचे काम ३८ वर्षांचा अनुभवी रंगाना हेराथ याने केले. त्याने ३३.३ षटकांत ५४ धावांत पाच गडी टिपले. उपाहारानंतर त्याने स्टोव्ह ओकिफे याची दांडी गुल करीत सामना संपविला. या विजयासह लंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी संपादन केली आहे. आॅस्ट्रेलियाचा भारतीय उपखंडात हा सलग सातवा पराभव होता. २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियाने भारतात चार कसोटी सामने गमाविले होते. त्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ यूएईत २०१४-१५ मध्ये पाकिस्तानकडून ०-२ ने पराभूत झाला. या संघाने २०११ मध्ये गाले येथे लंकेविरुद्ध शेवटचा कसोटी विजय नोंदविला होता.अखेरच्या दिवशी ३ बाद ८३ वरून सुरुवात करणाऱ्या पाहुण्या संघाने अ‍ॅडम व्होक्सचा लवकरच बळी दिला. मिशेल मार्शने स्मिथला साथ देत ३७ चेंडूंत तीन चौकारांसह २५ धावा केल्या. हेराथच्या चेंडूवर तो पायचित झाला. स्मिथलादेखील त्यानेच पायचित करीत तंबूची वाट दाखविली. यष्टिरक्षक पीटर नेव्हल हा ९, मिशेल स्टार्क शून्य, नाथन लियोन ८ आणि ओकिफे ४ धावा काढून परतले. पहिल्या डावात आॅस्ट्रेलियाचे ४९ धावांत चार गडी बाद करणाऱ्या हेराथने सामन्यात एकूण नऊ गडी बाद केले. लंकेच्या दुसऱ्या डावात करिअरमधील पहिले शतक झळकाविणारा कुशल मेंडिस (१७६ धावा) याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघांत दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून गाले येथे सुरू होईल. (वृत्तसंस्था)>खराब फलंदाजीमुळे पराभव : स्मिथआॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने पराभवाचे खापर ढिसाळ फलंदाजीवर फोडले. तो म्हणाला, फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले नाहीत हा आमचा दोष आहे. कुशाल मेंडिस याने देखील १७६ धावा ठोकून सामना आमच्याकडून हिसकून घेतला.’ विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला : मॅथ्यूजआॅस्ट्रेलियावर १७ वर्षानंतर ऐतिहासिक कसोटी विजय मिळाल्याचे श्रेय सांघिक कामगिरीला असल्याची प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने शनिवारी व्यक्त केली. विजयानंतर आंनद व्यक्त करीत मॅथ्यूज म्हणाला,‘ गेले काही महिने लंका क्रिकेटसाठी खराब ठरले. या विजयामुळे कमालीचे चैतन्य आले आहे. विजयाचे वर्णन करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही सांघिक सराव केला आणि सामन्यात सांघिक कामगिरी बजावली.