शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

85 वर्षाच्या भारतीय क्रिकेट विश्वातील विराटसेनेचा ऐतिहासिक विक्रम

By admin | Updated: March 28, 2017 13:35 IST

अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली.

ऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. 28 - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका खेळाडूंनी ठोकलेली शतकं, बळींची रास आणि त्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील बाचाबाची, स्लेजिंगमुळे चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली. कसोटी क्रमवारीतील नंबर एकवर असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताच्या कसोटी इतिहासाच्या 85 वर्षात पहिल्यांदाच असा पराक्रम विराटसेने केला आहे. 2015मध्ये भारतीय संघाची श्रीलंका विरोधात विजयी रथाला सुरुवात झाली होती, अद्याप ती कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पराभव करत सलग सातव्या वेळीस भारताने विजय मिळवला. हा भारताच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केल्यास रिकी पॉटिंगने आतापर्यंत सलग सर्वात जास्त विजय मिळवले आहेत. पॉटिंगने सलग 9 वेळा मालिका विजय मिळवला आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुणे येथे खेळलेल्य़ा पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 333 धांवानी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. आणि तिसरा कसोटी अनिर्णीत राखण्यात कांगारुंना यश आले होते. मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.

विराटसेनेचे सलग सात मालिकाविजय

  1. - भारत विरुद्ध श्रीलंका 2-1 (3 टेस्ट) : 2015
  2. - भारत विरुद्ध द. अफ्रीका 3-0 (4) : 2015-16
  3. - भारत विरुद्ध वेस्टइंडीज 2-0 (4) : 2016
  4. - भारत विरुद्ध न्युझीलंड 3-0 (3) : 2016-17
  5. - भारत विरुद्ध इंग्लैंड 4-0 (5) : 2016-17
  6. - भारत विरुद्ध बांग्लादेश 1-0 (1) : 2016-17
  7. - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2-1 (4) : 2016-17