शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्याच्या सुखमनी बाबरेकरची ऐतिहासिक कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:07 IST

राष्ट्रीय वरिष्ठ गट धनुर्विद्या स्पर्धा : धीरजचा पराभव करून जिंकले महाराष्ट्रासाठी पहिले सुवर्ण

- शिवाजी गोरे पुणे : महाराष्ट्राच्या १९ वर्षीय सुखमनी बाबरेकरने रिकर्व्ह प्रकारात आॅलिम्पिक खेळाडू जयंत तालूकदार, अनातू दास, तरुणदीप राय यांना मागे टाकून आणि अंतिम लढतीत आंध्र प्रदेशच्या बी. धीरजचा ६-० गुणांनी पराभव करून वरिष्ठ गट धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर हक्कप्रस्थापित करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महिला गटात आॅलिम्पियन झारखंडच्या दीपिका कुमारीने आपल्याच संघाच्या अंकिता भगतला ६-० गुणांनी नमवित सुवर्णपदक जिंकले. 

आर्चरी असोसिएशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने घोरपडी येथील आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी सायंकाळी झालेल्या अंतिम लढतीत अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या परतवाडा येथील धनुर्विद्यापटू सुखमनी बाबरेकरने तिनही फेºयांमध्ये अचूक लक्ष्य साधून आपल्या महाराष्टÑासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. प्रथम लक्ष्य साधताना बी. धीरजने पहिल्या फेरीत (९,७,८) २५, तर सुखमनी बाबरेकरने पहिल्या फेरीत  (९, १०, ९ ) २८ गुणांचे लक्ष्य साधून  २ गुण संपादन केले. नंतर दुसºया फेरीत धीरजने (१०,८,७) २६, तर सुखमनीने (१०.९.८) २७ गुणांचे संपादन करून पुन्हा २ गुण संपादन केले. तिसºया व अंतिम फेरीत धीरजचे (९,९,८) २६, तर सुखमनीने (१०,९,८) २७ गुणांची कमाई करून, धीरजचा ६-० गुणांनी पराभव केला. या दोघांना अंतिम लढतीत तीन, तीन बाणांचे लक्ष्य पाच फेºयांत साधायचे होते. जो अचूक लक्ष्य साधून जास्त गुण संपादन करेल त्याला दोन गुण मिळणार होते. सुखमनीने पहिल्या तीन फेºयांतच ६ गुण संपादन करून सुवर्ण पदकावर कब्जा केला. 

महिलांच्या अंतिम रिकर्व्ह प्रकारात आॅलिम्पियन दीपिका कुमारीने पहिल्या फेरीत (१०.१०.९) २९, दुस-या फेरीत (१०.९.८) २७, तिसºया फेरीत (१०,१०,९) २९ गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकले. तिच्या संघाच्या अंकिता भगतला पहिल्या फेरीत (९,८,८) २५, दुसºया फेरीत (९,९,८) २६ व तिसºया फेरीत (१०,९,८) २७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

 

 सुवर्णपदक जिंकल्यामुळे खूप आनंद झाला आहे. ज्युनिअर खेळाडू असूनसुद्धा आॅलिम्पिक खेळाडूंना मागे टाकत ही कामगिरी केली याचा जास्त आनंद आहे. आता आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि टोकियो आॅलिम्पिकसाठी सराव सुरू करणार आहे. 

-सुखमनी बाबरेकर