गुवाहाटी : टोकियो आॅलिम्पिक २०२० साठी क्वालिफाय करण्यासाठी आपल्या टायमिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या हिमा दासने म्हटले आहे़ दास म्हणाली, आॅलिम्पिकसाठी अद्यापही दोन वर्षे शिल्लक आहेत़ मी क्वालिफाय करू शकेन की नाही, हे जरी मला माहीत नसले तरी मी परिश्रम घेतेय़ ‘धिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध आसामची धावपटू हिमा म्हणाली, की भारतीय अॅथलेटिक्स महासंघ व भारतीय आॅलिम्पिक संघ तिच्या प्रशिक्षकांसोबत चर्चा करून तिला कोठे सराव करायचा आहे, हे निश्चित करणार आहेत़ ते आम्हाला कोठेही सरावास पाठविले तरी आम्ही जाण्यास तयार आहोत़
हिमाचे लक्ष्य ‘टोकियो आॅलिम्पिक-२०२०’चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:45 IST