शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

हिकेन शाहची न्यायालयात धाव!

By admin | Updated: August 9, 2015 22:36 IST

फिक्सिंगच्या कथित आरोपांमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बंदीचा सामना करणारा मुंबईचा फलंदाज हिकेन शाह याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

मुंबई : फिक्सिंगच्या कथित आरोपांमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बंदीचा सामना करणारा मुंबईचा फलंदाज हिकेन शाह याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या या अपिलावर ११ आॅगस्ट रोजी सुनावणी होईल. हिकेनकडून त्याचे वकील सोम सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश व्ही. एम. कनाडे आणि न्यायाधीश बी. पी. कोलाबावाला यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने ही सुनावणी केली. त्यांनी हिकेनला सध्यातरी काही दिलासा दिला नाही. मात्र, बीसीसीआयकडून लेखी स्वरूपात उत्तर मागविले आहे. आता पुढील सुनावणी ११ रोजी होईल. यासंदर्भात, हिकेन म्हणाला, मी निर्दाेष असून यासाठी संघर्ष करणार आहे. सूत्रांनुसार, बीसीसीआयने हिकेनविरुद्ध कथित आरोपांवर कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याच विषयाला केंद्रस्थानी धरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याबरोबरच हिकेनने इंग्लंड येथे खेळण्यासाठी परवागनी मिळावी, अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्यात जुलैमध्ये बीसीसीआयने हिकेनच्या निलंबनाबाबत म्हटले होते की, हिकेनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या आपल्या साथीदाराला फिक्सिंगसाठी प्रवृत्त केले होते. जो आयपीएलमधील एका संघाचा सदस्य होता. त्यानंतर या खेळाडूने ही माहिती फ्रेन्चायझीला दिली आणि त्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला कळविले. त्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. (क्रीडा प्रतिनिधी)