कोलंबो : श्रीलंकेचा स्टार लेफ्ट आर्म स्पिनर रंगना हेराथ याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देताना वनडे आणि टष्ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.हेराथ म्हणाला, की निवृत्ती घेण्याचा निर्णय सोपा नव्हता; परंतु मी कसोटी क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि त्यासाठी मी छोट्या स्वरूपाच्या क्रिकेटला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. हेराथने याविषयी श्रीलंकन क्रिकेट मंडळालाही कळवले आहे आणि मंडळाने त्याच्या निर्णयाला मान्यताही दिली आहे.स्टार गोलंदाज म्हणाला, की आम्हाला या वर्षी १२ कसोटी सामने खेळायचे आहेत आणि यात आपली तयारी आणखी मजबूत करण्यासाठी मी वनडे आणि टष्ट्वेंटी-२० मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. कसोटीचे व्यस्त वेळापत्रक पाहता माझे वनडे आणि टष्ट्वेंटी-२0 मध्ये खेळणे शक्य नव्हते. माझ्या या निर्णयाने युवा प्रतिभावान खेळाडूंनादेखील संघात स्थान मिळण्यास मदत मिळेल आणि वर्ल्डकपसाठी नवीन खेळाडू संघात स्थान मिळवू शकतात.३८ वर्षीय हेराथने आपल्या वनडे कारकीर्दीत ७१ वनडे सामन्यांत ७४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २0१४ मध्ये श्रीलंकेला टष्ट्वेंटी-२0 वर्ल्ड चॅम्पियन बनण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
हेराथने वनडे, टष्ट्वेंटी-२० मधून घेतली निवृत्ती
By admin | Updated: April 18, 2016 02:25 IST