शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पराभव वेदनादायी

By admin | Updated: August 11, 2014 02:12 IST

मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर हुरळून जायचे नाही आणि पराभव स्वीकारावा लागला तरी राग व्यक्त करायचा नाही

मँचेस्टर : मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर हुरळून जायचे नाही आणि पराभव स्वीकारावा लागला तरी राग व्यक्त करायचा नाही, ही कॅप्टन कुल धोनीची विशेषता आहे. मात्र मँचेस्टरमध्ये मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्याला आपली निराशा लपवता आली नाही. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पत्रकार परिषदेत धोनी हसऱ्या चेहऱ्याने आला. मात्र त्याला आपल्या नेहमीच्या शैलीने संघांच्या पराभवाचे समर्थन करता येत नव्हते. तसेच त्याला आपली निराशाही लपवता आली नाही. पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘हा पराभव आम्हाला जास्तच झोंबला आहे. खेळपट्टी चांगली असताना कसोटी सामन्यांत तीन दिवसांत पराभव स्वीकारावा लागणे निराशाजनक आहे. पहिल्या दिवशीची सुरुवातीचीे ४५ मिनिटे निर्णायक ठरली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे यजमान संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली. दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली नाही, असे तुम्हाला म्हणता येईल; पण पहिल्या दिवशी पहिल्या तासाचा खेळच महत्त्वाचा ठरला.’धावफलकावर धावा असणे महत्त्वाचे असते. लॉर्डस् कसोटीत तळाच्या फलंदाजांचे योगदान उल्लेखनीय ठरले. या मालिकेत तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाचव्या गोलंदाजाने अधिक धावा फटकाविल्या आहेत, असेही धोनी म्हणाला.संघातील काही फलंदाज फॉर्मात नाहीत, हे सत्य असले तरी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक आहे. जर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळाली तर प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्याची भारतीय गोलंदाजांमध्ये क्षमता आहे, ही सकारात्मक बाब या कसोटी सामन्यातून सिद्ध झाली.