शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

जिंकेल तो आत; हरेल तो बाहेर !

By admin | Published: May 27, 2016 4:02 AM

पहिल्याच सत्रात जेतेपदाचा स्वाद चाखण्यास इच्छुक असलेल्या गुजरात लायन्सला आज, शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल-९ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय नोंदविण्याचे

नवी दिल्ली : पहिल्याच सत्रात जेतेपदाचा स्वाद चाखण्यास इच्छुक असलेल्या गुजरात लायन्सला आज, शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल-९ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. ही लढत अर्थात गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशीच गाजणार यात शंका नाही.सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने यंदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत अव्वल स्थान पटकविले होत; पण पहिल्या क्वालिफायरमध्ये बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून पराभूत झालेल्या गुजरातसाठी दुसरा क्वालिफायर देखील जिंकणे सोपे दिसत नाही. सनरायझर्सविरुद्ध साखळीतील दोन्ही सामने गुजरातने गमविले आहेत. दोन्ही वेळा धावसंख्येचा बचाव करण्यात गुजरातला अपयश आले होते. आशिष नेहराच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे वेगवान मारा थोडा कमकुवत झालेल्या हैदराबादकडे भूवनेश्वर कुमार आणि मुस्तफिजूर रहमान हे आहेतच. या दोघांनी एलिमिनेटरमध्ये कोलकाताच्या फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले होते. लॉयन्सकडे देखील चांगले फलंदाज असल्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांना ते चांगले आव्हान देऊ शकतात. ब्रँडन मॅक्यूलमचा सुरुवातीचा धडाका गाजल्यास गुजरातला चांगली सुरुवात मिळू शकते शिवाय ड्वेन स्मिथ हा देखील गुजरातसाठी मोठी खेळी करू शकतो. अ‍ॅरोन फिंच हा आणखी एक फलंदाज स्वत:च्या बयावर सामन्याचे चित्र पालटू शकतो. सनरायझर्सचा विचार केल्यास युवी आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये परत आला आहे. याशिवाय शिखर धवन, कर्णधार डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांकडून चांगल्या सुरुवातीवर संघाची भिस्त अवलंबून राहील. सनरायझर्सचे वेगवान गोलंदाज आणि लॉयन्सचे तडफदार फलंदाज, अशी रोमहर्षकता अनुभवायला मिळणार आहे. यंदा फायनल कुणीही खेळू शकते; पण एक बाब निश्चित आहे. ती ही की आयपीएलला नवा विजेता मिळेल. आतापर्यंत विजेता राहिलेला एकही संघ यंदा जेतेपदाच्या शर्यतीत उरलेला नाही, हे विशेष. (वृत्तसंस्था)फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी थोडी मंद झाली आहेत. त्यावर मारा करणे सोपे नाही. गोलंदाजांचे सुरुवातीपासून फलंदाजांवर वरचढ होण्याचे डावपेच येथे चालू शकणार नाहीत. फलंदाजांना देखील धावा काढण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. काल युवराजसिनगने फलंदाजीच्यावेळी हेच तंत्र अवलंबले.वॉर्नरने कोलकाताविरुद्ध सामन्याविषयी म्हटले, दोन वेळेसच्या चॅम्पियनविरुद्ध संघाचे क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण होते. आम्ही या स्पर्धेत प्रथमच चांगले क्षेत्ररक्षण केले आणि गुजरातविरुद्धही तशीच कामगिरी करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण चांगले केले, तर चुरशीचा सामना जिंकू शकतो, हे आम्हाला माहीत होते. आमच्या खेळाडूंनी सुरेख क्षेत्ररक्षण करताना शानदार झेल पकडले. त्यामुळे आम्ही सामन्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलो. आम्ही प्रत्येक सामन्यात या भागात सुधारणा केली आहे. आम्ही आमचा चांगला बेंचमार्क स्थापित केला आहे आणि यापुढे आणखी सुधारणा करावी लागेल. डावाच्या अंतिम क्षणी बिपुलने ज्या धावा केल्या त्या खूप उपयुक्त ठरल्या. आमच्या कमी धावा झाल्या; परंतु अशा खेळपट्टीवर १६0 च्या जवळपास आव्हानात्मक धावसंख्या असते आणि आमच्या गोलंदाजांनी या धावांचा यशस्वीपणे बचाव केला.सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आयपीएल ९ च्या क्वॉलिफायर २ मध्ये आपला प्रतिस्पर्धी गुजरात लायन्सला इशारा देताना त्यांच्या जवळ प्रतिस्पर्धी संघासाठी जबरदस्त व्यूहरचना असल्याचे सांगितले.हैदाराबाद आणि गुजरात या दोन संघांतील विजयी संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. लढतीआधी वॉर्नर म्हणाला, ‘दोन्ही संघाला विजयासाठी आपली पूर्ण क्षमता आणि कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. गुजरातची दुबळी बाजू आम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडे ड्वेन स्मिथसारखा खतरनाक खेळाडू आहे; परंतु त्याला रोखण्यासाठी आम्ही व्यूहरचना आखली आहे आणि ही व्यूहरचना आम्हाला अमलात आणावी लागेल. आमच्या संघासाठी चांगली बाब म्हणजे प्रत्येक खेळाडू प्रत्येक सामन्यात काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वच खेळाडू एकमेकांशी चर्चा करीत आहेत आणि एकमेकांचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोलकाताविरुद्ध एलिमिनेटरमध्ये आमच्या विजयाचे हेच सर्वांत मोठे कारण होते. भुवनेश्वरसारखा गोलंदाज सातत्याने मोझेस हेन्रिक्ससोबत चर्चा करीत आहे. त्याचा परिणाम तुम्ही पाहातच आहात. हेन्रिक्सने सामन्यात दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले.’