सिडनी : जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट रिओ आॅलिम्पिकमध्ये ‘स्प्रिंट क्लीन स्वीप’ची ‘हॅट्ट्रिक’ साधण्याच्या इराद्याने उतरणार आहे. मागील आठ वर्षांपासून धावत असलेल्या बोल्टचे हे अखेरचे आॅलिम्पिक असेल. सध्याच्या युगातील महान खेळाडूंमध्ये गणना होत असलेले मोहम्मद अली, मायकेल जॉर्डन आणि जॅक निकोलस यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत बोल्टने आधीच स्थान पटकविले आहे. रिओचे तिकीट मिळविणाऱ्या बोल्टने आठ वर्षांपासून वेगवान शर्यतीवर स्वत:चा ठसा उमटविला; शिवाय तो कायम राखला. तो १००, २०० आणि ४ बाय ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण विजेता आहे. यंदाही तिन्ही पदके जिंकून त्याचा हॅट्ट्रिक साधण्याचा इरादा आहे. ३० वर्षे पूर्ण करण्याच्या एक दिवसआधी २० आॅगस्ट रोजी रिओत नवव्या आॅलिम्पिक फायनलमध्ये सहभागी होईल. जखम आणि फिटनेसची समस्या फेटाळून लावणारा बोल्ट म्हणाला,‘‘मी रिओसाठी पूर्णपणे सज्ज आहे. बोल्टने पहिल्यांदा बीजिंग आॅलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण शंभर मीटर शर्यतीत जिंकले तेव्हा पाच दिवसांनंतर त्याचा २२ वा वाढदिवस होता. ९.६९ सेकंदांसह त्याने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यानंतर जमैकाच्या या खेळाडूने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. जगातील क्रीडा चाहते त्याचे ‘फॅन’ बनले. त्याने ११ वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविण्यासोबतच बीजिंग आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकली होती. (वृत्तसंस्था)>2009च्या बर्लिन विश्व चॅम्पियशिपमध्ये शंभर मीटरमध्ये उसेन बोल्टने 9.58सेकंद आणि २०० मीटरमध्ये 19.19सेकंद या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.
‘स्प्रिंट स्वीप’च्या हॅट्ट्रिकचे लक्ष्य
By admin | Updated: July 22, 2016 03:31 IST