शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरमनप्रीत कौरची झुंझार खेळी, भारत अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:29 IST

अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 21 - अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत आता भारताचा इंग्लंडबरोबर सामना होणार आहे. 
आज झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 36 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफान खेळी केली. दरम्यान, या सामन्यात भारताने दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. ठराविक धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले.  फलंदाज अॅलेक्स ब्लॅकवेलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. मात्र, ती अपयशी ठरली. तर, संघाची कर्णधार मेग लेनिग अवघ्या शून्य धावेवर तंबूत परतली. तर, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल हिने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या फळीतील फलंदाजी लवकर ढासळली. अ‍ॅलिस विलानीने 75 धावा केल्या. निकोल बोल्टन (14), अ‍ॅलिस पेरी (38), बेथ मूनी (1), अ‍ॅश्ले गार्डनर (1), जेस जोनासेन (1), मेगान शट (2) आणि ख्रिस्टीन बीम्स नाबाद 11 धावा केल्या.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 40.1 षटकात 245 धावा केल्या. 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत 42 षटकात 4 बाद 281 धावा केला होत्या. भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरने हिने धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफानी खेळी केली. तर, स्मृती मंधना (6) आणि पूनम राऊत (14) हे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार मिताली राज (36) व हरमनप्रीत यांनी डाव सावरला. दिप्ती शर्माने 25 आणि वेदा कृष्णामूर्तीने नाबाद 16 धावांची खेळी केली. 
भारताकडून गोलंदाज दिप्ती शर्मा, झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. तर, ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज अ‍ॅलिस विलानी, ख्रिस्टीन बीम्स, अ‍ॅश्ले गार्डनर आणि मेगान शट यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.