शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सचिनमुळे हरमनप्रीतला मिळाली रेल्वेत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:35 IST

नवी दिल्ली, दि.२३ - सचिन तेंडुलकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रेल्वेत नौकरीची संधी मिळाली असे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - भारतीय महिला क्रिकेट संघाची मधल्या फळीतील फलंदाज हरमनप्रीत कौरने उपांत्य सामन्यात नाबाद शतकी (११५ चेंडूत १७१ धावा) खेळी केली. बाद फेरीच्या सामन्यात मधल्या फळीत येऊन सर्वाधिक धावा करण्याचा करिष्मा हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला. कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीने क्रिकेट जगतात बोलबाला सुरु आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांनी हरमनप्रीतमध्ये असणारी प्रतिभा सर्वप्रथम हेरली. हरमनप्रीत एक चांगली अष्टपैलू खेळाडू असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला पश्चिम रेल्वेकडून खेळवण्यासाठी एडलजी यांनी खास प्रयत्न केले.एडुलजी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या की, दक्षिण रेल्वेकडून २४ वर्षीय हरमनप्रीतला ऑफर मिळाली होती. पण तिला चांगले पद देऊन पश्चिम रेल्वेकडून खेळण्याचा पर्याय उपलब्ध होता. ती दक्षिण रेल्वेमध्ये कनिष्ठ पदावर कार्यरत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून खेळण्यासाठी मी तिला चांगले पद ऑफर केले. तिला अधिकारी पदाची ऑफर मी दिली. दिल्लीला यांसदर्भात पत्र पाठवण्यात आले. पण याला राष्ट्रपतींकडून मान्यता मिळाली नाही. यासंदर्भात त्यानंतर सचिन तेंडूलकरची मदत घेतली.एडुलजी म्हणाल्या की, राज्यसभा सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी हरमनप्रीतच्या नियुक्तीसाठी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली. याप्रकरणी त्यांनी रेल्वेमंत्री आणि प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रल्वेमध्ये नोकरीत समाविष्ट करुन घेण्यात आले.