शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

By admin | Updated: July 6, 2017 01:42 IST

चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे.

- सौरव गांगुली चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे. पाहुणा संघ १९० धावांचे सहज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. या पराभवास जबाबदार खेळाडूृंना धारेवर धरले गेले. कुमकुवत विंडीजविरुद्ध सामना गमविल्यामुळे टीका होणे स्वाभाविक आहे. अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य लहान वाटत असले तरी अवघड होते. प्रामाणिकपणे बोलायचे तर हे लक्ष्य मुळीच सोपे नव्हते. विकेटवर पाय रोवणे आणि नंतर लक्ष्य गाठणे असे विजयाचे समीकरण होते. हे काम पूर्ण करण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन फलंदाज होते. दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. धोनीने चांगली सुरुवात केली पण लक्ष्य भेदण्यात तो देखील अपयशीच ठरला. वन डे क्रिकेटमध्ये धोनीचे तंत्र वेगळेच आहे. अनेकदा तो आपल्या तंत्रात यशस्वी ठरला पण या सामन्यात तो स्वत:च्या चक्रव्यूहात अडकला असावा. अशा परिस्थितीत यश आणि अपयशामध्ये पुसटशी रेषा असते. धोनीला स्वत:चा प्रयत्न यशस्वी करता आला नाही. माझ्यामते हार्दिक पांड्याचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट ’ ठरला. तो चांगला फलंदाज आहे शिवाय धोनीच्या सोबतीने दडपण झुगारण्यात पटाईत मानला जातो. त्यानंतर रवींद्र जडेजा हा देखील धोनीची साथ देण्यात अपयशी ठरला. या पराभवामुळे कितीही टीका झाली झाली तरी अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग खरोखर कठीण होता, हे मान्य करावे लागेल. या खेळपट्टीवर चेंडू जुना झाला की अधिक धोकादायक ठरतो. चेंडू कधी उसळी घेईल, याचा वेध घेणे कठीण होते शिवाय वेगवान आॅफ ब्रेक मारा खेळणे अधिक कठीण होऊन बसते. धोनी लवकर बाद झाला असता तर सामना देखील फार आधी संपला असता.भारताला अखेरचा वन डे जमैकाच्या मैदानावर खेळायचा आहे. येथील खेळपट्टी अँटिग्वाच्या तुलनेत चांगली आहे. हा सामना भारताने जिंकायलाच हवा. भारतीय संघात काही बदल होऊ शकतील. पण जे बदल होतील त्या स्थितीतही विंडीजवर विजय नोंदवायलाच हवा. (गेमप्लान)