शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हरभजनसिंगमुळे सामन्याला कलाटणी

By admin | Updated: May 21, 2015 00:24 IST

हरभजनसिंगने सलग दोन चेंडूंत घेतलेले दोन बळी आमच्या संघासाठी महागडे ठरले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळवून आयपीएल आठमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले,

मुंबई : हरभजनसिंगने सलग दोन चेंडूंत घेतलेले दोन बळी आमच्या संघासाठी महागडे ठरले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळवून आयपीएल आठमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.एक वेळ १८८ धावांचे लक्ष्य गाठू शकू असे वाटत होते; परंतु हरभजनसिंगने सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बाद करीत सामन्याला कलाटणी दिली, असे फ्लेमिंग म्हणाले.फ्लेमिंग म्हणाले की, ‘आम्ही लक्ष्याचा चांगला पाठलाग करीत होतो; परंतु हरभजनसिंगच्या दोन चेंडूंनी सामन्याचे चित्रच पालटले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमितपणे विकेट गमावल्या, तर विजय मिळवणे कठीण होते. आमच्यासोबतही हेच झाले. आम्ही दोन मोठे खेळाडू रैना आणि धोनी यांना गमावले. त्यामुळे हा टर्निंग पॉइंट होता.हरभजनसिंगने जम बसलेल्या सुरेश रैना (२५) याला झेल देण्यास भाग पाडले आणि नंतर पुढच्याच चेंडूवर धोनीला पायचीत केले. हरभजनने २६ धावांत २ बळी घेतले.त्याचबरोबर फ्लेमिंग यांनी मुंबईचा लेंडल सिमन्स (६५) आणि पार्थिव पटेल (३५) यांच्यातील सलामीसाठी झालेली भागीदारीही पराभवाचे एक कारण असल्याचे सांगितले.ते म्हणाले की, हा चुरशीचा सामना होता. मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे कठीण आहे हे आम्हाला माहीत होते. त्यांनी खूप चांगला खेळ केला. पहिले सहा षटके महत्त्वाची होती. आम्हाला सुरुवातीला दोन विकेटस् घेण्याची आवश्यकता होती; परंतु त्यांच्या सलामीच्या जोडीने चांगली भागीदारी केली. आम्ही त्यांना १८७ धावांवर रोखून चांगली कामगिरी केली, असे मला वाटते.’(वृत्तसंस्था)