शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

ब्राझीलकडून हैतीचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 03:50 IST

फिलिप कुटिन्हो याने नोंदविलेल्या तीन गोलांच्या बळावर आठ वेळच्या जेत्या बलाढ्य ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत हैतीचा ७-१ने धुव्वा उडविला.

कोपा अमेरिका : फिलिप कुटिन्हो याने नोंदविलेल्या तीन गोलांच्या बळावर आठ वेळच्या जेत्या बलाढ्य ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत हैतीचा ७-१ने धुव्वा उडविला. ब गटात बुधवारी झालेल्या या सामन्यात सहज विजय मिळवून ब्राझीलने ४ गुणांसह गटात अव्वल स्थान राखले आहे. यापूर्वी ब्राझीलचा इक्वेडोर संघाशी झालेला सामना ०-० असा बरोबरीत सुटला होता, तर पेरूने हैती संघाला १-०ने मात दिली होती. मध्यरक्षक कुटिन्हो याने १४व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ २९व्या मिनिटाला गोल करून कुटिन्होने दुसरा गोल करून आघाडी वाढविली. त्यानंतर ३३व्या मिनिटाला हैतीला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, ब्राझीलच्या बचावफळीने त्यांचा प्रयत्न विफल केला. यानंतर दोनच मिनिटांनी रेनातो अगस्तोने तिसरा गोल करून आघाडी ३-०ने वाढविली. गॅब्रियलने ५९व्या, लुकास लिमाने ६७व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी ५-० अशी वाढविली. त्यानंतर हैतीचा मार्सेलिन याने ७०व्या मिनिटाला गोल करून आघाडी १-५ अशी कमी केली. मात्र, तोपर्यंत ब्राझीलने सामन्यावर पूर्ण पकड मिळविली होती. अगस्तो याने ८६व्या मिनिटाला, तर कुटिन्हो याने अतिरिक्त वेळेत वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून ब्राझीलला ७-१ असा सहज विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)>मेस्सी खेळण्याची शक्यता अर्जेंटिनाचा प्रसिद्ध खेळाडू लियोनेल मेस्सी पनामा संघाविरुद्ध आज, शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात होंडुरास संघाशी झालेल्या लढतील मेस्सीच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे कोपा अमेरिका स्पर्धेतील चिली संघाशी झालेल्या पहिल्या लढतीत मेस्सी खेळू शकला नव्हता. पनामाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या सरावसत्रात मेस्सीने हजेरी लावून कसून सराव केला.