शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

गुप्टिलची विक्रमी खेळी पुनरागमनास पुरेशी नाही

By admin | Updated: March 3, 2017 00:16 IST

सलामीवीर मार्टिन गुप्टिल याने द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डेत विक्रमी शतक ठोकले.

वेलिंग्टन : सलामीवीर मार्टिन गुप्टिल याने द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डेत विक्रमी शतक ठोकले. पण त्याची ही खेळी कसोटी संघात स्थान मिळविण्यास पुरेशी नसल्याचे मत न्यूझीलंडचे कोच माइक हेसन यांनी व्यक्त केले आहे.गुप्टिलने हॅमिल्टन येथे १३८ चेंडूत नाबाद १८० धावा ठोकल्या. यामुळे न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा सात गड्यांनी पराभव केला. मालिका देखील २-२ अशी बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून द. आफ्रिकेविरुद्ध वन-डेत ठोकलेल्या या सर्वोच्च धावा ठरल्या. हेसन यांनी गुप्टिल याच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले. सोबतच ३० वर्षांच्या गुप्टिलला आधीदेखील कसोटीत खेळण्याची संधी दिली पण तो अपयशी ठरल्याचे नमूद केले. द. आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात येणार नाही, असे हेसन यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘मार्टिनचा रेकॉर्ड असला तरी तो कसोटी संघात दिसणार नाही. एखाद्या प्रकारात खेळणारा खेळाडू दुसऱ्या प्रकारात यशस्वी ठरेलच असे नाही. जगभरात अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. क्रिकेटचे सर्व तिन्ही प्रकार अन्य प्रकारांपासून भिन्न आहेत. गुप्टिलची वन-डेतील सरासरी ४३.९८ अशी असली तरी कसोटीत त्याने केवळ २९.३८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मागच्या वर्षी भारत दौऱ्यानंतर गुप्टिलला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला होता. भारत दौऱ्यात त्याने सहा डावांत केवळ एक अर्धशतक ठोकले होते. (वृत्तसंस्था)