व्हीसीए क्रिकेट पारितोषिक वितरण २८ रोजीनागपूर: विदर्भ क्रिकेट संघटनेच्यावतीने २०१३-१४ या मोसमात आयोजित विविध क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार २८ जून रोजी व्हीसीए सिव्हील लाईन्स येथील बिलमोरिया हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात १६ आणि १९ वर्षे, गझदर लीग, आंतर अकादमी सामने, आंतर शालेय आणि आंतर महाविद्यालयीन, खरागड चषक तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
गझदर क्रिकेट पारितोषिक वितरण
By admin | Updated: June 27, 2014 17:53 IST