ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 8- कोलकाता नाइट रायडर्सनं घरच्या मैदानावर गुजरात लायन्ससमोर 159 धावांचं ठेवलेल लक्ष्य गुजरातने 5 विकेटच्या मोबदल्यात 18 व्या षटकात पार केले. या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. गुसरातने सांघिक खेळाच्या जोरावर हा विजय संपादन केला आहे. गुजरातकडून दिनेश कार्तिकने अर्धशतकी खेळी केली. त्याने 29 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने झटपट 52 धावा केल्या. गुजराततर्फे स्मिथ (27), मॅक्युलम (29), रैना (14), फिंच (29) यांनी संघाच्या विजयात म्हत्वपुर्ण भुमीकी बजीवली. 18 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत जडेजाने संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने 9 धावांची खेळी केली. केकेआर तर्फे रसेल,चावला,हॉग, शकिब यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. त्यपुर्वी, युसूफ पठाण आणि शकिब अल हसन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने निर्धारित 20 षटकात 158 धावापर्यंत मजल मारली होती. पहिल्या 4 विकेट झटपट गमावल्यानंतर या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी संघाला सन्माजनक धावसंख्या उबा करुन दिली होती. केकेआरने 24 धावांत आपले आघाडीचे 4 फलंदाज गमावले होते. त्यानंतर हसन आणि पठाण यांनी 134 धावांची नाबाद भागीदारी करत संघाची धावसंख्या वाढवली. हसननं 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावांचा खेळी केली तर पठाणनंही नाबाद राहत 41 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार खेचत 63 धावा केल्या होत्या.
गुजरातचा 'लॉयन्स' विजय
By admin | Updated: May 8, 2016 23:32 IST