शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

गुलेर्मोे ओचोवाने मेक्सिकोला तारले

By admin | Updated: June 19, 2014 04:58 IST

मेक्सिकोचा गोलकीपर गुलेर्मोे ओचोवा याने दोन हल्ले शिताफीने थोपवून धरल्यामुळे मंगळवारी रात्री झालेला यजमान ब्राझीलविरुद्धचा सामना गोलशून्यने अनिर्णीत राहिला

फोर्टालेझा : मेक्सिकोचा गोलकीपर गुलेर्मोे ओचोवा याने दोन हल्ले शिताफीने थोपवून धरल्यामुळे मंगळवारी रात्री झालेला यजमान ब्राझीलविरुद्धचा सामना गोलशून्यने अनिर्णीत राहिला. अ गटाच्या या सामन्यात ब्राझीलला विजयाची आशा होती; पण प्रतिस्पर्धी गोलकीपरने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. फ्रान्सच्या एसी एजासिओ संघाकडून खेळणारा २८ वर्षांचा ओचोआ याने २६व्या मिनिटाला नेमारचा प्रयत्न परतवून लावला. नेमारचा हेडर त्याने उजवीकडच्या कोपऱ्यात झेप घेऊन अडविला. त्यानंतर ८७व्या मिनिटाला ओचोआने थिएंगो सिल्वा याचा हेडरदेखील रोखला. यामुळे स्टेडियममध्ये जमलेले ब्राझीलचे चाहते निराश झाले होते. क्रोएशियावर ब्राझीलच्या ३-१ने मिळविलेल्या विजयात दोन गोल नोंदविणारा नेमार याने कालदेखील अनेक शानदार मूव्ह बनविल्या; पण मोक्याच्या क्षणी त्याचा प्रयत्न फसल्याने अपयश पदरी पडले. पाच वेळेच्या विजेत्या ब्राझीलचे खेळावर बराच काळ वर्चस्व होते; पण मेक्सिकोचा बचाव आणि गोलकीपर ओचोआ याला भेदण्यात आक्रमक फळी कमकुवत ठरली. गोलशून्यने अनिर्णीत राहिलेला यंदाच्या विश्वचषकातील हा दुसरा सामना होता. याआधी इराण-नायजेरिया लढत अनिर्णीत राहिली. अ गटात ब्राझील आणि मेक्सिको प्रत्येकी ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. याच गटात क्रोएशिया आणि कॅमेरुनचादेखील समावेश आहे. पूर्वार्धात आॅस्कर, मार्सेलो आणि नेमार यांनी ब्राझीलकडून सातत्याने हल्लाबोल केला. मार्सेलो १४व्या मिनिटाला जखमी होताच मैदानाबाहेर पडला. फेड आणि पाल्हिन्हो हेदेखील मिळालेल्या संधीचा लाभ घेऊ शकले नाहीत. मेक्सिकोने यादरम्यान आपली बचाव फळी अभेद्य राखली. २४व्या मिनिटाला त्यांचा खेळाडू हेक्टर हेरारा याचा शॉट ब्राझीलचा खेळाडू ज्युलियो सेसार याने क्लिअर केला. नेमारने २६व्या मिनिटाला डॅनी अल्वेसच्या क्रॉसवर मारलेला हेडर ओचोआने या विश्वचषकात शानदारपणे रोखण्याचा मान मिळविला. ओचोआने ४३व्या मिनिटाला आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. या वेळी नेमारनेच फटका मारला होता.ब्राझीलचे कोच फिलिप स्कोलारी यांनी रेमीरेजऐवजी बर्नार्डला बदली खेळाडू म्हणून मैदानावत पाठविले. उत्तरार्धात मेक्सिकोने पल्यिा १५ मिनिटांत काही उत्कृष्ट हल्ले केले, तर ब्राझील संघाने लय गमावल्याचे चित्र होते. याचा फायदा घेऊन मेक्सिकोच्या खेळाडूंनी तीन लाँग शॉट मारले; पण तिन्ही शॉट क्रॉसबारच्या वरून निघून गेले. ओचोआने सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात नेमारच्या फ्री किकवर थिएगो सिल्वाने मारलेला हेडर रोखून ब्राझीलला विजयापासून दूर ठेवले. (वृत्तसंस्था)