शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पाहुण्यांनी गुडघे टेकले

By admin | Updated: November 14, 2015 23:08 IST

आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन आणि डावखुरा रवींद्र जडेजा यांच्या भेदक माऱ्यापुढे द. आफ्रिकेने म. गांधी-नेल्सन मंडेला मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अक्षरश: गुडघे टेकले.

बंगळुरू : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन (७० धावांत चार बळी) आणि डावखुरा रवींद्र जडेजा (५० धावांत चार बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे द. आफ्रिकेने म. गांधी-नेल्सन मंडेला मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अक्षरश: गुडघे टेकले. भारताने पाहुण्या संघाला अवघ्या २१४ धावांत गारद केल्यानंतर दिवसअखेर बिनबाद ८० धावा करीत सामन्यावर पकड निर्माण केली आहे.भारतीय फिरकीपटूंनी मोहालीतील कामगिरीची पुनरावृत्ती चिन्नास्वामी स्टेडियमवर करीत आफ्रिकेला ५९ षटकांत गुंडाळले. मोहालीत आठ गडी बाद करणाऱ्या आश्विन आणि जडेजा यांनी पुन्हा एकदा पाहुण्यांची दमछाक करीत नतमस्तक होण्यास भाग पाडले. द. आफ्रिकेकडून शंभरावी कसोटी खेळणारा एबी डीव्हिलियर्स याने भारतीय फिरकीचा प्रतिकार करीत सर्वाधिक १०५ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह ८५ धावा केल्या. भारताने दमदार सुरुवात केली. मुरली विजय आणि शिखर धवन यांनी ८० धावांची भागीदारी केली. शानदार फॉर्ममध्ये असलेला विजय ७३ चेंडूंत पाच चौकारांसह २८ आणि धवन ६२ चेंडूंत सात चौकारांसह ४५ धावांवर नाबाद आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि व्हर्नोन फिलँडर या दोन्ही वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अन्य गोलंदाज निष्प्रभ ठरले. भारत द. आफ्रिकेच्या तुलनेत १३४ धावांनी मागे असून दहा गडी शिल्लक आहेत.आश्विनने पाहुण्यांना सलग धक्के दिले. स्टियान वान झिल (१०), फाफ डू प्लेसिस (००), जेपी ड्युमिनी (१५)आणि मोर्ने मोर्केल (२२) हे आश्विनचे बळी ठरले. वरुण अ‍ॅरॉनने कर्णधार हाशिम आमलाची दांडी गुल केली, तर काइल एबोट (१४) याला यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि शिखर धवन यांनी धावबाद केले. चहापानाच्या आधी डीव्हिलियर्सच्या रूपात आफ्रिकेला जबर धक्का बसला. जडेजाच्या चेंडूवर साहाने त्याचा झेल घेतला. हा झेल फार खाली असल्याने पंचांना निर्णय देताना तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली. बराच वेळ रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिले. डीव्हिलियर्स- एल्गर यांनी चौथ्या गड्यासाठी ३३ आणि ड्युमिनीसोबत पाचव्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. एल्गरने ८१ चेंडूंत ३८ आणि ड्युमिनीने १५ धावांचे योगदान दिले. द. आफ्रिकेचे पहिले पाच फलंदाज १२० धावांत बाद झाले होते. रबाडाला जडेजाने भोपळा न फोडू देता चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केले. अखेरचे पाच फलंदाजदेखील फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)धावफलकद. आफ्रिका पहिला डाव : स्टियान वान झिल पायचित गो. आश्विन १०, डीन एल्गर त्रि. गो. जडेजा ३८, फाफ डुप्लेसिस झे. पुजारा गो. आश्विन ०, हाशीम आमला त्रि. गो. अ‍ॅरोन ७, एबी डिव्हिलियर्स झे. साहा गो. जडेजा ८५, जेपी ड्युमिनी झे. रहाणे गो. आश्विन १५, डेन विलास झे. आणि गो. जडेजा १५, काइल अ‍ॅबोट धावबाद १४, कासिगो रबाडा झे. पुजारा गो. जडेजा ०, मोर्ने मोर्केल झे. बिन्नी गो. आश्विन २२, इम्रान ताहीर नाबाद ०, अवांतर : ८, एकूण : ५९ षटकांत सर्व बाद २१४ धावा. गडी बाद क्रम : १/१५, २/१५, ३/४५, ४/७८, ५/१२०, ६/१५९, ७/१७७, ८/१७७, ९/२१४. गोलंदाजी : ईशांत १३-३-४०-०, बिन्नी ३-२-१-०, आश्विन १८-२-७०-४, अ‍ॅरोन ९-०-५१-१, जडेजा १६-२-५०-४.भारत बिनबाद ८० धावाभारत पहिला डाव : मुरली विजय खेळत आहे २८, शिखर धवन खेळत आहे ४५, अवांतर : ७, एकूण २२ षटकांत बिनबाद ८० धावा. गोलंदाजी : मोर्केल ७-१-२३-०, अ‍ॅबोट ६-१-१८-०, रबाडा ५-१-१७-०, ड्युमिनी २-०-९-०, ताहीर २-०-९-०. अमित मिश्रावर अन्यायबेंगळुरू : जगातील सर्वांत धोकादायक फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा ज्या गोलंदाजाने एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावांत त्रिफळा उडवला त्या गोलंदाजाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. याला अन्याय नाहीतर दुसरे काय म्हणता येईल? भारतीय लेगस्पिनर अमित मिश्राने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सर्वांत धोकादायक फलंदाज डिव्हिलियर्सला दोन्ही डावात क्लीन बोल्ड केले होते. भारताच्या विजयाचे हे सर्वांत महत्त्वाचे कारण ठरले होते, पण बेंगळुरूमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात मिश्राला वगळण्याचा आश्चर्यचकित करणारा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली. स्टुअर्ट बिन्नीने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात केवळ तीन षटके गोलंदाजी केली तर आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने १८ तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने १६ षटके गोलंदाजी केली. या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेतले. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात २१४ धावा फटकावल्या. त्यात डिव्हिलियर्सने एकाकी झुंज देताना ८५ धावांची खेळी केली. मिश्राच्या जागी बिन्नीची निवड करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहे.बीसीसीआयने अलीकडे मुंबईत झालेल्या वार्षिक आमसभेमध्ये हितसंबंध जोपासले जात असल्याच्या मुद्यावर राष्ट्रीय निवड समितीतून रॉजर बिन्नी यांना वगळले. स्टुअर्ट बिन्नीवर राष्ट्रीय निवड समिती सदस्याचा मुलगा असल्याचा ठपका लागला आहे. त्यामुळे रॉजर बिन्नी यांना निवड समितीतून वगळण्यात आले.