शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गौडा, थिंगालीयाला हिरवा कंदील

By admin | Updated: July 5, 2017 01:43 IST

गत चॅम्पियन विकास गौडाची गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याबाबतची

भुवनेश्वर : गत चॅम्पियन विकास गौडाची गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याबाबतची अनिश्चितता आज संपली. राष्ट्रीय महासंघाने प्रदीर्घ चर्चेनंतर अखेरच्या क्षणी गौडाच्या नावाला मंजुरी दिली. स्पर्धेचे आयोजन स्थळ असलेल्या कलिंग स्टेडियममध्ये चाचणी देणारा महाराष्ट्राचा धावपटू सिद्धांत थिंगालीया याचाही या स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला. भारत या स्पर्धेचे यजमानपद तिसऱ्यांदा भूषवित आहे. बुधवारी ३४ वर्षांचा होणाऱ्या गौडाला ५७.७९ मीटर थाळीफेक करता आली. काही राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मते ही कामगिरी पदकाच्या शर्यतीची नाही. अमेरिकेत राहात असलेला गौडा आता सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक नोंदविण्याच्या उद्देशाने स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याने पुणे येथे २०१३ मध्ये ६४.९० मीटर थाळीफेक करीत सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. चीनमधील वूहान येथे यापूर्वी झालेल्या स्पर्धेत त्याने ६२.०३ मीटरचे अंतर गाठताना सुवर्णपदक पटकावले होते. गौडाने २००५ मध्ये कोरियातील इंचियोन व २०११ मध्ये जपानमधील कोबे येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते. एएफआयने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,‘राष्ट्रीय विक्रमवीर विकास गौडा आणि सिद्धांत थिंगाल्या यांच्यासह चाचणीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या खेळाडूंना कलिंग स्टेडियममध्ये होणाऱ्या २२ व्या आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.’लांबउडीपटू सिद्धांत मोहन नाईक व नयना जेम्स यांच्याव्यतिरिक्त तिहेरी उडीपटू कार्तिक उन्नीकृष्णन व जायलिन एम. लोबो यांना शनिवारी झालेल्या चाचणीनंतर स्पर्धेत सहभागी होण्यास मंजुरी देण्यात आली. यजमान भारताचे या स्पर्धेत ९५ सदस्यांचे पथक सहभागी होत आहे. त्यात ४६ महिला खेळाडूंचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)