शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबची विजेतेपदाला गवसणी

By admin | Updated: April 17, 2015 01:46 IST

ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबने दबदबा राखताना शानदार विजेतेपद पटकावले.

मुंबई : ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबने दबदबा राखताना शानदार विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आश्चर्यकारक आगेकूच करणाऱ्या रायगडच्या बीकेएम क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान २३-१३ असे परतावून गुडमॉर्निंग संघाने बाजी मारली.प्रभादेवी येथील एकनाथ ठाकूर क्रीडा नगरीमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच गुडमॉर्निंग संघाने आपले वर्चस्व राखले होते. आक्रमक व खोलवर चढाई करण्यात तरबेज असलेल्या बीकेएमचे प्रत्येक आक्रमण रोखताना गुडमॉर्निंगने आघाडी वाढवत ठेवली. मध्यांतराला गुडमॉर्निंगने आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले.दुसऱ्या सत्रात गुडमॉर्निंग संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. दबावाखाली आलेल्या बीकेएम संघाच्या कमजोर संरक्षणाचा फायदा उचलताना सचिन पाष्टे आणि सुनील सावंत यांनी तुफानी व खोलवर चढाया करताना संघाची आघाडी आणखी वाढवली. स्वप्निल भादवणकर आणि संदीप भट यांनी दमदार पकडी करताना बीकेएम संघाला पूर्णपणे हतबल केले. या सांघिक खेळाच्या जोरावर अखेर गुडमॉर्निंग संघाने बीकेएमचा प्रतिकार २३-१३ असा मोडताना विजेतेपदावर दिमाखात कब्जा केला. मितेश पाटील व अनिल कोठेकर यांची कडवी झुंज अखेर बीकेएमचा पराभव टाळू शकली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)वैयक्तिक विजेते :सर्वोत्कृष्ट खेळाडू : मितेश पाटील (बीकेएम)सर्वोत्कृष्ट आक्रमक : सचिन पाष्टे (गुडमॉर्निंग)सर्वोत्कृष्ट संरक्षक : आरिफ सय्यद अली (पोयसर जिमखाना)