शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची चांगली संधी

By admin | Updated: June 28, 2017 00:43 IST

वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. पण, माझ्यामते तो सामनाही भारताने जिंकला असता. कारण, वेस्ट इंडिजचा संघ खूप कमजोर आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली नाही. त्याशिवाय अफगाणिस्तान सारख्या नवख्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यावर त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे हा संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिघडलेला दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता राष्ट्रीय संघासाठी खेळत नाहीए. ख्रिस गेल, सुनिल नरेन, द्वेन ब्रावो यांसारखे अनेक खेळाडू अनेक काळापासून वेस्ट इंडिजसाठी कधी खेळतात, तर कधी खेळत नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचे क्रिकेट खूप बिघडले आहे. काही लोकांचे मत आहे की, भारतीय क्रिकेट संघाला विंडिज दौऱ्यावर जाऊन काय मिळाले? परंतु, माझ्या मते भलेही विंडिज संघ कमजोर असेल, पण ही मालिका भारतीय संघासाठी, खेळाडूंसाठी आणि कर्णधारासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची संधी आहे. जे खेळाडू संघाबाहेर बसलेत, त्यांना संधी देणे किंवा आणखी १०-१२ खेळाडू असे आहेत, जे भारतीय संघातून खेळू शकतात, अशा खेळाडूंना संधी देता येऊ शकते. त्यामुळे म्हणावा तसा मजबूत प्रतिस्पर्धी नसलेल्या संघाच्या दौऱ्यावर प्रयोग करण्याची उत्तम संधी भारताकडे आहे. त्याशिवाय, आपण २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी तंदुरुस्त आहोत, हे सिध्द करण्यासाठी काही खेळाडूंवर दबाव असेल. राहुल द्रविडने तर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांना इशारा देत नुकतीच एक प्रतिक्रीयाही दिली. त्यामुळे वाढत्या वयाचा या दिग्गज खेळाडूंवरही दबाव असेल. तसेच, अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूला संधी मिळाल्यानंतर त्याने शतक झळकावले. तो आता आघाडीच्या फळीमध्ये कोणाचीही जागा घेऊ शकतो. गोलंदाजीमध्ये दोन वर्षांपुर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादव प्रमुख गोलंदाज होते, पण आता ती जागा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतली आहे. त्यामुळे संघात अनेक उलटफेर होऊ शकतात. या सर्व घडामोडी लक्षात घेऊनच निवडकर्ते आणि कर्णधाराला पुढे जावं लागेल. कर्णधाराच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, ही मालिका कर्णधारासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. गेल्या काही दिवसांमध्ये कर्णधार कोहलीचा माजी प्रशिक्षक कुंबळेसह जो काही वाद झाला, तो वाद मागे टाकून संघाला पुन्हा एकदा विजयी प्रवाहामध्ये आणण्याचे मुख्य लक्ष्य कोहलीपुढे असेल. यामुळे त्याचा आणि संघाचाही आत्मविश्वास वाढेल.