शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

गोल्फादेवी संघाचा दबदबा

By admin | Updated: May 8, 2017 03:52 IST

एकतर्फी झालेल्या सामन्यात गोल्फादेवी संघाने एस.एस.जी संघाचा ५०-१५ असा धुव्वा उडवत नुकताच पार पडलेल्या कुमार गट कबड्डी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकतर्फी झालेल्या सामन्यात गोल्फादेवी संघाने एस.एस.जी संघाचा ५०-१५ असा धुव्वा उडवत नुकताच पार पडलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. गोल्फादेवीच्या शार्दुल हरचकरचा स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यासह यंदाच्या मोसमातील पाचवे विजेतेपद गोल्फादेवी संघाने आपल्या नावे केले आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आदर्श नगर येथील वरळी स्पोटर््स क्लबच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या निर्णायक सामन्यात शार्दुल, धनंजय सरोज यांनी आक्रमक व खोलवर चढाया करुन आपले वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे अनिकेत जठारच्या मजबूत पकडीमुळे एसएसजी संघाच्या अडचणीत वाढ झाली. गोल्फादेवी संघाने पकडी आणि चढाई या दोन्ही क्षेत्रात शानदार खेळाचे प्रदर्शन करत मध्यांतराला तीन लोणसह ३०-०५ अशी एकतर्फी आघाडी घेत स्पर्धेचा जेतेपदावर एकप्रकारे शिक्काच मारला. त्याचबरोबर या भल्यामोठ्या पिछाडीच्या दडपणाखाली आलेल्या एसएसजीच्या खेळाडूंनी नंतर पुनरागमाचे प्रयत्नही सोडल्याने गोल्फादेवीने सहज बाजी मारली. फॉर्ममध्ये असलेल्या पंकज मोहिते आणि सर्वेश चाचे यांचे अपयश एसएसजीसाठी महागात पडले. यामुळे त्यांना एकूण चार लोणच्या नामुष्कीला सामोरे जात तब्बल ३५ गुणांच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दरम्यान स्पर्धेतील सर्वोत्तक चढाईपटू व सर्वोत्तम पकड या पुरस्कांरांवर अनुक्रमे पंकज मोहिते आणि सर्वेश चाचे या एसएसजीच्या खेळाडूंनी कब्जा केला.