शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दत्तू भोकनळने पटकावले सुवर्ण

By admin | Updated: July 18, 2016 06:19 IST

रिओ आॅलम्पिकसाठी पात्र ठरलेला तळेगावरोहीचा जवान दत्तू भोकनळ याने अमेरिकेतही यशाचा डंका कायम

नाशिक : रिओ आॅलम्पिकसाठी पात्र ठरलेला तळेगावरोहीचा जवान दत्तू भोकनळ याने अमेरिकेतही यशाचा डंका कायम राखताना आंतरराष्ट्रीय रोर्इंग (नौकानयन) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने आधीच्या कामगिरीत सुधारणा करत सर्वोत्तम टायमिंग साधताना हे यश मिळवले. चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील मूळ रहिवासी असलेल्या व लष्करात जवान म्हणून कार्यरत असलेल्या दत्तू भोकनळ याने बीजिंगमध्ये असलेल्या आशियाई रोर्इंग (नौकानयन) अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला होता. शनिवारी पार पडलेल्या आणि २० देशाच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय युएसए रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने कामगिरीत सातत्य कायम राखतांना बाजी मारली. स्पर्धेतील अन्य सहा स्पर्धकांचे आव्हान मोडून काढतांना त्याने प्रथम क्रमांक मिळवण्यासह सुवर्णपदकावर नाव कोरले. दत्तू भोकनळ आॅगस्ट मध्ये रिओ येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेकरता सध्या अमेरीकेत सराव करीत आहे. या निमित्त त्याने तेथे त्याने यु. एस.ए. चॅम्पियनशिप स्पर्धेत सरावाच्या दृष्टीने सहभाग नोंदवत हे घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेतील दोन किलोमीटर शर्यतीचे अतंर दत्तूने सात मिनीटे दहा सेकंदांत पार करत सुवर्णपदक मिळविले. त्याला प्रशिक्षक पॉल मोखा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या पदकाने दत्तू भोकनळ आॅलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्याच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकला आहे. त्याच्या या यशाचा आनंद नाशिक जिल्ह्याबरोबरच चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथे साजरा करण्यात आला.दत्तू भोकनळ हा रोर्इंगपटू दि. १९ जुन रोजी अमेरिकेत आॅलिम्पिक स्पर्धेच्या सरावा निमित्त रवाना झाला. मात्र तेथील खर्च त्याला पेलवत नसल्याने तो सध्या तेथील एका भारतीय गुजराथी कुटुंबाकडे पेर्इंग गेस्ट म्हणून वास्तव्यास आहे. दत्तू भोकनळ लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग विभागामध्ये कार्यरत आहे. त्याने गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेमध्ये रोर्इंग एकेरीत सुवर्णपदक पटकाविले होते. सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्याने रोर्इंगचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्याने विविध स्पर्धेत सहभागी होत पदकांची कमाई केली. आॅक्टोबर २०१५ मध्ये बीजिंग येथे झालेल्या अशियाई नौकानयन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ७:१८:४१ अशी वेळ नोंदवत त्याने रौप्यपदक पटकावले. कोरिया येथे यावर्षी झालेल्या फिसा अशिया अ‍ॅण्ड ओशीयाना कॉन्टिनेंटल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेत त्याने यश मिळविले आहे.