ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 19 - येत्या ५ आॅगस्टपासून रिओ (ब्राझील) येथे सुरू होत असलेल्या आॅलिम्पिकसाठी नागपुरातून एकही खेळाडू जाणार नसला तरी, पाच क्र क्रीडाप्रेमींना मात्र क्रीडा महाकुंभ याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे.विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने जगभ्रमण करणारे ओमप्रकाश मुंदडा, हेमलता मुंदडा, माजी राष्ट्रीय बास्केटबॉलपटू व स्थानिक आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी दीपक मोघे, आयुर्विमा अधिकारी हर्षितनायडू आणि संजय लिखार हे रिओ आॅलिम्पिकदरम्यान स्वयंसेवकाची जबाबदारी वठविणार आहेत.मंगळवारी आयोजित एका छोटेखानी समारंभात बिगबेन फुटबॉल क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भावना व्यक्त करताना मुंदडा म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या क्रीडा सोहळ्यासाठी पाचव्यांदा जात असल्याबद्दल मलाअत्यानंद होत आहे. २०४ देशांमधील १० हजार ५०० खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी फारच कमी क्र ीडाप्रेमींना मिळते. जगातील अनेक देशांची संस्कृती आणि सभ्यता यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळण्याचेआॅलिम्पिक हे एकमेव व्यासपीठ आहे. आमच्यासारख्या पाठीराख्यांमुळे भारतीय खेळाडूंना चांगल्या कामिगरीसाठी प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.दीपक मोघे म्हणाले, आॅलिम्पिकबद्दल मी आतापर्यंत केवळ वर्तमानपत्र आणि टीव्हीवर माहिती घेतली. आता प्रत्यक्षात स्पर्धेचा अनुभव मिळणार असल्याने कमालीचा उत्सुक आहे. भारतीय उपखंडात आॅलिम्पिक खेळ पहायला जाणारे फार कमीलोक आहेत.ह्ण आताकुठे लोकांमध्ये जाणीव निर्माण होत असल्याने २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये नागपुरातून किमान शंभर पाठिराखे आॅलिम्पिक पहायला जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंदडा यांचे हे सलग पाचवेआॅलिम्पिक असून, उर्वरित स्वयंसेवक प्रथमच जात आहेत. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. आत्माराम पांडे यांनी केले.
नागपूरचे पाच क्रीडाप्रेमी रिओ आॅलिम्पिकला जाणार
By admin | Updated: July 19, 2016 21:10 IST