शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत व्हर्च्युअल रन’मध्ये नऊवारीत धावली गोव्याची कविता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:59 IST

जगात स्वप्नांच्या मागे धावणारे खूप आहेत. पण आरोग्य सांभाळण्यासाठी धावणारे तसे कमीच. गोव्याच्या कविता चाटी (मूळ अकोला-महाराष्ट्र) ‘हाउसवाईफ’ जरी असल्या तरी आरोग्याच्या बाबतीत त्या खूप जागरूक आहेत.

- सचिन कोरडे  पणजी : जगात स्वप्नांच्या मागे धावणारे खूप आहेत. पण आरोग्य सांभाळण्यासाठी धावणारे तसे कमीच. गोव्याच्या कविता चाटी (मूळ अकोला-महाराष्ट्र) ‘हाउसवाईफ’ जरी असल्या तरी आरोग्याच्या बाबतीत त्या खूप जागरूक आहेत. कधी काळी केवळ एक किलोमीटरची शर्यतही पूर्ण न करणाºया कविता आता ५-१० किलोमीटर सहज धावतात. नुकताच ‘लोकमत’ने आयोजिलेल्या ‘नाईन यार्ड व्हर्च्युअल रन’ शर्यतीत त्यांनी अनोख्या पद्धतीने भाग घेतला. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत त्यांनी नऊवारी साडीत पाच किमीची शर्यत पूर्ण केली. 

कविता चाटी या गेल्या अठरा वर्षांपासून गोव्यात आहेत. दोन मुलांपैकी एक मोठा मुलगा आल्हाद चाटी हा राष्ट्रीय जलतरणपटू आणि दत्त चिकित्सकही आहे. त्यांचा संपूर्ण परिवार आरोग्याबाबत जागरूक आहे. त्यामुळे कविता यांनी सुद्धा आरोग्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार याकडे लक्ष दिले. आता त्या गोव्यात आयोजित होणाºया प्रत्येक मॅरेथॉन स्पर्धेत धावतात. ‘लोकमत’ने आयोजिलेल्या स्पर्धेतही त्यांचा अग्रणी सहभाग राहिला आहे. 

त्या म्हणतात, नऊवारी साडी संस्कृतीचे प्रतीक आहे. ती नेसून धावणे म्हणजे मला   भारतीय संस्कृतीची सेवा करायची संधी मिळाल्यासारखे आहे. ‘लोकमत’ने ही संधी मिळवून दिली त्याबद्दत त्यांची आभारी आहे. माझ्या या मोहिमेला माझ्या  कुटुंबाचा, तसेच माझ्या सर्व मैत्रिणींचा फार मोठा हातभार आहे. या सर्वांच्या सहकार्याने मी नऊवारीत पाच किलोमीटरची शर्यत पूर्ण करू शकले.  पहिल्यांदाच नऊवारीत मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच नऊवारी नेसून धावली आहे. ही माझी तिसरी व्हर्च्युअल रन होती. सध्याच्या कोरोनाच्या संकटात सगळीकडे नैराश्याचे वातावरण आहे. शरीर सशक्त आणि निरोगी ठेवणे आजच्या काळाची नितांत गरज आहे. कधी कधी मनात डोकावणारी निराशा दूर झटकून टाकण्याची यातून ताकद मिळते. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वयंस्फूर्तीने धावायला पाहिजे, असे कविता चाटी यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा