शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

गोलरक्षक श्रीजेश पाच महिने मैदानाबाहेर

By admin | Updated: June 28, 2017 00:43 IST

राष्ट्रीय हॉकी संघाचा नंबर वन गोलकिपर आणि माजी कर्णधार पी.आर. श्रीजेश गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे पाच महिने मैदानाबाहेर राहणार आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय हॉकी संघाचा नंबर वन गोलकिपर आणि माजी कर्णधार पी.आर. श्रीजेश गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे पाच महिने मैदानाबाहेर राहणार आहे. यामुळे तो आॅक्टोबरमध्ये ढाका येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.नुकत्याच झालेल्या विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीदरम्यान भारताला श्रीजेशची उणीव जाणवली. त्याच्या उजव्या गुडघ्यावर याच महिन्यात मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली. एप्रिल-मे मध्ये झालेल्या अझलन शाह चषक स्पर्धेत तो जखमी झाला होता. हॉकी इंडियाचे हायपरफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीजेशला तंदुरुस्त होऊन परतण्यास किमान पाच महिने लागतील. अर्थात तो डिसेंबरमध्ये भुवनेश्वर येथे आयोजित विश्वचषक हॉकी लीग खेळू शकेल. जॉन म्हणाले, ‘श्रीजेशची उणीव भासते आहे. विकास दहिया आणि आकाश चिटके अद्याप युवा गोलकिपर आहेत. दोघेही जगातील अव्वल गोलकिपरच्या पंक्तीत बसत नाहीत. पुढील सहा महिन्यात आम्हाला गोलकिपरची फळी उभारण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. श्रीजेशवर डॉ. अनंत जोशी यांनी दहा दिवसांआधी शस्त्रक्रिया केली. तो पुढील पाच महिने खेळू शकणार नाही. श्रीजेशच्या अनुपस्थितीत आणखी काही गोलकिपर तयार करण्यावर आम्ही भर देणार आहोत.’ (वृत्तसंस्था)