हुंडेकरी विरुद्ध समर्थ नेटमध्ये रंगणार लढत लढतीकडे लक्ष्य : अंतिम सामना रविवारी
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
अहमदनगर : आ़ अरुणकाका जगताप चषक टी २० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात येथील हुंडेकरी मोटर्सने श्रीरामपूर येथील भगत ॲकॅडमी संघावर ३ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरी गाठली़ आता रविवारी होणार्या अंतिम सामन्यात हुंडेकरी विरुद्ध समर्थ नेट आमने-सामने राहणार आहेत़
हुंडेकरी विरुद्ध समर्थ नेटमध्ये रंगणार लढत लढतीकडे लक्ष्य : अंतिम सामना रविवारी
अहमदनगर : आ़ अरुणकाका जगताप चषक टी २० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात येथील हुंडेकरी मोटर्सने श्रीरामपूर येथील भगत ॲकॅडमी संघावर ३ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरी गाठली़ आता रविवारी होणार्या अंतिम सामन्यात हुंडेकरी विरुद्ध समर्थ नेट आमने-सामने राहणार आहेत़ भगत ॲकॅडमीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्यांनी २० षटकांत ९ गड्यांच्या बदल्यात विरोधकांसमोर १२८ धावांचे आव्हान ठेवले़ भगतच्या अण्णा लोखंडे ३६, महेश कांबळे २५ तर किशोर ठाणगेने २५ धावा केल्या. हुंडेकरी कडून गोलंदाजी करताना अभिजित दुधे याने ४ षटकात २२ धावा देत ४ बळी मिळवले व एक निर्धाव षटक टाकले. अजिम काझी याने २२ धावा देत ३ बळी मिळवले. गोपाळ गुरकुदे याने १७ धावा देत २ बळी मिळवले. हुंडेकरी संघाने १८़४ षटकात ७ गड्यांच्या बदल्यांत १२८ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. हुंडेकरीच्या गोपाळ गुरकुदे याने ४३, शाहरुख सय्यद नाबाद २६ तर महेश मुंडे याने ३३ धावा केल्या. हुंडेकरीच्या अभिजित दुधे याला मॅन ऑफ दी मॅच ने सन्मानित करण्यात आले़ या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि़१२) हुंडेकरी मोटर्स विरुध्द समर्थ नेट यांच्यात होणार आहे़