शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

विजयी पथ गाठण्याचे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे लक्ष्य

By admin | Updated: April 15, 2016 04:20 IST

आपापले सलामीचे सामने गमावणारे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब शुक्रवारी परस्परांविरुद्ध आयपीएल ९मध्ये खेळतील तेव्हा घरच्या मैदानावर विजयी

नवी दिल्ली : आपापले सलामीचे सामने गमावणारे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब शुक्रवारी परस्परांविरुद्ध आयपीएल ९मध्ये खेळतील तेव्हा घरच्या मैदानावर विजयी पथावर येण्याचे दिल्लीचे डावपेच असतील. मागच्या सत्रात तळाच्या स्थानावर राहिलेल्या दिल्ली आणि पंजाबला सलामीला विजयाची आशा होती; पण दोन्ही संघांना अनुक्रमे केकेआर आणि गुजरात लॉयन्सकडून मार खावा लागला. दिल्ली मागच्या वर्षी सातव्या स्थानावर होता. यंदा खेळाडूंच्या उत्तम समन्वयामुळे विजयी पथावर परतण्याचे मनुसबे आहेत. चॅम्पियन्स लीग टी-२०साठी दोनदा पात्र ठरलेल्या डेअरडेव्हिल्सकडे १९ वर्षांखालील संघाचा कोच राहिलेला राहुल द्रविड मेंटर म्हणून उपलब्ध आहे. पॅडी उपटनसारखे कोच आहेत. झहीरसारखा नवा कर्णधार आहे. कोलकात्याविरुद्ध दिल्ली संघ १७.४ षटकांत ९८ धावांत गारद झाला. यामुळे झहीरची चिंता वाढली. फलंदाज चालणार नसतील, तर सामने कसे जिंकायचे, असे मत त्याने मांडले. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात सलग ४ षटकार खेचणारा कार्लोस ब्रेथवेट हादेखील लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे साडेआठ कोटींत खरेदी करण्यात आलेला अष्टपैलू पवन नेगी याच्याकडून आणखी सरस कामगिरीची अपेक्षा असेल. फलंदाजीत दिल्लीसाठी केवळ क्विंटन डिकॉक, संजू सॅमसन हेच उपयुक्त खेळी करू शकले. नाथन कूल्टर नाईल, ख्रिस मॉरिस, अमित मिश्रा आणि झहीर यांच्यामुळे दिल्लीचा मारा सक्षम वाटतो. पहिला सामना गमावल्यानंतरही झहीरने आमच्यासाठी तो खराब दिवस असल्याचे सांगून आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास व्यक्त केला होता. मी खेळाडूंच्या कामगिरीवर आनंदी असून, सर्वच खेळाडूंनी ऊर्जावान खेळ केला, असे म्हटले होते. उपविजेता व सेमीफायनलिस्ट राहिलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला गत मोसमात तळाच्या स्थानावर राहावे लागले होते. यंदाच्या सत्रात संघात कोणताही दिग्गज खेळाडू नाही. (वृत्तसंस्था) किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), ख्रिस मॉरिस, महंमद शमी, नॅथन कुल्टर-नाईल, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, अमित मिश्रा, क्विंटन डिकॉक, श्रेयस अय्यर, जेपी ट्युमिनी, ऋषभ पंत, मयंक अगरवाल, इम्रान ताहीर, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, एल्बी मॉर्केल, जयंत यादव, पवन नेगी, खलील अहमद, सॅम बिलिंग्ज, ख्रिस मॉरिस, चमा मिलिंद, अखिल हरवदकर, महीपाल लोमरोर, जोएल पॅरिस व पवन सुयाल.