शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पदकाची अंधुक आशा...

By admin | Updated: July 30, 2016 05:26 IST

रिओ आॅलिम्पिकसाठी विविध खेळांतील भारताच्या कामगिरीविषयी तर्कवितर्क लढविले जात असताना एक खेळ असा आहे की, ज्यामध्ये पदक मिळविण्याबाबत अंधुक आशा असली तरी

- रोहित नाईक, मुंबई रिओ आॅलिम्पिकसाठी विविध खेळांतील भारताच्या कामगिरीविषयी तर्कवितर्क लढविले जात असताना एक खेळ असा आहे की, ज्यामध्ये पदक मिळविण्याबाबत अंधुक आशा असली तरी, क्षमता मात्र नक्की आहे. हा खेळ म्हणजे टेबल टेनिस. बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या दोन्ही खेळांंतील वैशिष्ट्यपूर्ण साम्य म्हणजे यश मिळवायचे असेल तर, चिनी भिंत पार करावी लागेल. त्यामुळेच भारतीयांचा टेबल टेनिसमध्ये मोठा कस लागणार हे मात्र निश्चित...यंदाचे टेबल टेनिस वर्ष आतापर्यंत भारतासाठी खूप चमकदार ठरले. १९९२ सालच्या बार्सिलोना आॅलिम्पिकमध्ये चेतन बबूर, सुजय घोरपडे, कमलेश मेहता आणि नियती रॉय-शाह या चौकडीने टेबल टेनिस विश्वाला भारताची दखल घेण्यास भाग पाडले. यानंतरही भारताने आॅलिम्पिक टेबल टनिसध्ये भाग घेतला. मात्र, बार्सिलोनासारखी छाप पाडता आली नाही. यंदाच्या ‘रिओ’मध्ये मात्र ही कसर भरून निघेल. किंबहुना बार्सिलोनापेक्षाही अधिक चांगली कामगिरी अचंता शरथ कमल, सौम्यजित घोष, मौमा दास आणि मनिका बत्रा ही चौकडी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बबूर यांनी भारताकडून सर्वाधिक तीन आॅलिम्पिक स्पर्धा खेळल्या असून, ‘रिओ’मध्ये भारताच्या पदकाचा प्रबळ दावेदार असलेला शरथ कमल त्यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. सहाजिकच त्याचा प्रदीर्घ अनुभव इतर खेळाडूंसाठी मोलाचा ठरणार आहे. याआधी शरथने २००४ अथेन्स व २००६ बिजिंग आॅलिम्पिकमध्ये चमक दाखविली होती. रिओमध्ये पुरुष एकेरीत शरथ आणि सौम्यजित घोष, तर महिला एकेरीत मौमा दास आणि मनिका बत्रा भारताचे प्रतिनिधित्व करतील. शरथ भारताचा दिग्गज टेबल टेनिस खेळाडू असून, पदकासाठी त्याच्याकडून सर्वाधिक आशा आहेत. सध्या जागतिक क्रमवारीत ६९व्या स्थानी असलेल्या शरथने २०१५ मध्ये ३२व्या स्थानांपर्यंत झेप घेतली होती. ‘अर्जुन पुरस्कार’ विजेता शरथने युरोपियन लीग स्पर्धेतही चमक दाखविली. सध्या जर्मनीतील डसेलफोर्ड येथे वास्तव्यास असलेल्या शरथने २०१० साली यूएस चॅम्पियनशिप आणि इजिप्त ओपन स्पर्धा जिंकल्या. शिवाय प्रतिष्ठेची आयटीटीएफ प्रो टूर एकेरी विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय असा पराक्रमही शरथने केला आहे. २००६ राष्ट्रकुल स्पर्धेत शरथने आॅस्टे्रलियाच्या विलियम हेंजेलला त्याच्या घरच्या मैदानात लोळवून दिमाखात सुवर्ण जिंकले. याच स्पर्धेत सांघिक सुवर्णही पटकावताना त्याने डबल धमाका केला. तर २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुभाजित साहाबरोबर खेळताना दुहेरीत सुवर्ण पटकावले. दुसरीकडे, वयाच्या १९व्या वर्षी सर्वांत युवा राष्ट्रीय विजेता म्हणून विक्रम नोंदविलेला सौम्यजितचा वेगवान खेळ भारतासाठी चमत्कार घडवू शकतो. सौम्यजितने २०१६ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अभिमानाने तिरंगा फडकविला. तर २०१३ व २०१५ अशा दोन राष्ट्रकुल स्पर्धा गाजविताना त्याने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदक अशी एकूण सहा पदकांची लयलूट केली. २०१२ साली लंडन आॅलिम्पिकमध्ये त्याने आॅलिम्पिक प्रवेश करणारा सर्वांत युवा भारतीय खेळाडूचा विक्रम नोंदविला.वुमन्स चँलेंज...- आशिया आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या श्रेणीत उझबेकिस्तानच्या रिम्मा गुफ्रानोवला ४-१, असे नमवून मौमा दासने आॅलिम्पिक तिकीट निश्चित केले. याआधी २००४ साली आॅलिम्पिक खेळलेली मौमा भारताची आतापर्यंतची सर्वांत यशस्वी महिला टेबल टेनिस खेळाडू म्हणून ओळखली जाते. १९९७ साली वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी मौमाने राष्ट्रकुल स्पर्धेत छाप पाडली. यानंतर २००१ साली दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. २००६ मेलबर्न राष्ट्रकुलमध्ये मौमाने सुवर्णपदक पटकावले. तर २०१० दिल्ली राष्ट्रकुलमध्ये तिने सांघिक रौप्य आणि दुहेरी कांस्य जिंकले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा राखलेल्या मौमाने २००५ ते २००७ अशी सलग तीन वर्षे एकेरी, दुहेरी आणि अनेक स्पर्धांत जेतेपद पटकावले. त्याचवेळी जागतिक क्रमवारीत ११५व्या स्थानी असलेली मनिका बत्रा अव्वल भारतीय महिला खेळाडू आहे. २०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली. तर पुढच्याच वर्षी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने सांघिक रौप्य आणि एकेरी कांस्य जिंकले. तर यंदा मार्चमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या भागात मनिकाने थेट सुवर्ण काबीज केले. ५ फूट १० इंचच्या उंच्यापुऱ्या मनिकाने यावर्षी १२व्या सॅग स्पर्धेत दबदबा राखताना तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.