शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विंडीजपुढे ‘जायंट किलर’ आयर्लंडचे आव्हान

By admin | Updated: February 16, 2015 02:55 IST

धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जायंट किलर’ आयर्लंडला विश्वकप स्पर्धेत सोमवारी वेस्ट इंडिज संघाच्या आव्हानाला

नेल्सन : धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जायंट किलर’ आयर्लंडला विश्वकप स्पर्धेत सोमवारी वेस्ट इंडिज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांत प्रतिभावान फलंदाजांचा समावेश आहे, पण गोलंदाजी उभय संघांसाठी चिंतेचा विषय आहे. २०११ च्या विश्वकप स्पर्धेत आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला होता; तर त्याआधी चार वर्षांपूर्वी आयर्लंडने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. आयर्लंडने विश्वकप स्पर्धेपूर्वी मानांकनामध्ये नवव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशविरुद्ध विजय नोंदविला होता. बांगलादेश संघ मानांकनामध्ये विंडीजपेक्षा एका स्थानाने खाली आहे. आयर्लंडने या लढतीत चार गडी राखून सरशी साधली होती. वेगवान गोलंदाज जॉन मुनी व मॅक्स सोरेन्सेन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले होते; तर अ‍ॅन्डी बालबर्नीने नाबाद ६३ धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजला गेल्या आठवड्यात सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. कॅरेबियन संघाचा डाव २९.३ षटकांत १२२ धावांत संपुष्टात आला होता. दुसऱ्या सराव सामन्यात विंडीजने स्कॉटलंडविरुद्ध तीन चेंडू राखून संघर्षपूर्ण विजय मिळविला होता. दुसऱ्या बाजूचा विचार करता आयर्लंडची फलंदाजीमध्ये भिस्त केव्हिन ओब्रायनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने चार वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ५० चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. आयर्लंड संघात नील ओब्रायन, विलियम पोर्टरफिल्ड आणि अ‍ॅड जॉयस यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवाची उणीव भासत आहे, पण क्रेग यंगने पाच महिन्यांपूर्वी स्कॉटलंडविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत पाच बळी घेतले होते. त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)