शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
2
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
3
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
4
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
5
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
6
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
7
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
8
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
9
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
10
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
12
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
13
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
14
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
15
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
16
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
17
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
18
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
19
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
20
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...

गेल झाला फेल

By admin | Updated: May 26, 2014 01:02 IST

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) गत तीन सत्रांत आपल्या स्फोटक खेळीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारा रॉयल चॅलेंजर्सचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मात्र चालू सत्रात फेल ठरला आहे़

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) गत तीन सत्रांत आपल्या स्फोटक खेळीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारा रॉयल चॅलेंजर्सचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मात्र चालू सत्रात फेल ठरला आहे़ विशेष म्हणजे चालू सत्रात या आक्रमक खेळाडूला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही़ वेस्ट इंडीजच्या गेलला दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सुरुवातीचे सामने खेळता आले नव्हते़ यानंतर त्याने ९ सामन्यांत बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले़ या सामन्यांत त्याला विशेष कामगिरी करता आली नाही़ त्याने ९ लढतीत २१़७७ च्या सरासरीने केवळ १९६ धावा केल्या आहेत़ त्याचा स्ट्राईक रेटही केवळ १०६़५२ असा होता़ या ९ डावांत या स्टार खेळाडूला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही़ आयपीएलच्या गत तीन सत्रांत गेलचाच बोलबाला होता़ त्याने २०११ च्या आयपीएल सत्रात १२ सामन्यांत ६८० धावा केल्या होत्या़ त्यानंतर २०१२ मध्येही त्याने १५ सामन्यांत १६० च्या स्ट्राईकरेटने विक्रमी ७३३ धावा केल्या होत्या़ गत आयपीएलमध्येही त्याची बॅट चांगलीच तळपली होती़ त्याने १६ सामन्यांत ७०८ धावा केल्या होत्या़ त्याचा स्ट्राईक रेट १५६़२९ असा होता़ ख्रिस गेलच्या अपयशामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे़ यावर्षी खेळलेल्या १४ सामन्यांपेकी केवळ ५ मध्ये बंगळुरूला विजय मिळविता आला आहे़ हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर राहिला आहे़ त्यामुळे त्यांच्यावर प्लेआॅफच्या शर्यतीतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवली आहे़ षट्कार मारणार्‍या खेळाडंूत सुरेश रैनाचा दुसरा क्रमांक लागतो़ त्याच्या नावावर आतापर्यंत १२६ षट्कार आहेत़ गेल याने आयपीएलच्या चालू सत्रात केवळ १२ षट्कार खेचले आहेत़ त्याआधी २०११ मध्ये त्याने ४४ षट्कार लगावले होते, तर २०१२ मध्ये ५९ आणि २०१३ मध्ये तब्बल ५१ षट्कार लगावले होते़