शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रिओमध्ये क्रीडाग्राम अद्याप सज्ज नाही!

By admin | Updated: July 27, 2016 03:50 IST

आॅलिम्पिकचे यजमान शहर असलेल्या ब्राझीलच्या रिओमध्ये क्रीडाग्राम अद्यापही सज्ज झालेले नाही. अनेक कामे रखडल्याने दहा दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प

रिओ : आॅलिम्पिकचे यजमान शहर असलेल्या ब्राझीलच्या रिओमध्ये क्रीडाग्राम अद्यापही सज्ज झालेले नाही. अनेक कामे रखडल्याने दहा दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. ५ आॅगस्ट रोजी आॅलिम्पिकचे उद्घाटन होईल, पण त्याआधी जगातील खेळाडूंचे निवासस्थान असलेले क्रीडाग्राम सुसज्ज होईल का, याबाबत संभ्रम कायम आहे.आॅस्ट्रेलियाच्या आॅलिम्पिक पथक प्रमुखांनी तर क्रीडाग्राम सज्ज नसेल, तर आम्ही आपल्या खेळाडूंना हॉटेलमध्ये ठेवण्यास पसंती देऊ, असे वक्तव्य केले आहे. दुसरीकडे आयोजकांनी रखडलेल्या कामांना गती देण्याचे वचन दिल्याने निर्धारित कालावधीत काम पूर्ण होईल, अशी आशा बाळगून आॅस्ट्रेलियाचे खेळाडू बुधवारपर्यंत येथे पोहोचतील, अशी शक्ता वर्तविण्यात आली आहे. ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत आयोजित या क्रीडा महाकुंभाला दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. अशातच क्रीडाग्राममधील अर्धवट कामांमुळे आयोजकांच्या चिंतेत भर पडली. आॅलिम्पिक क्रीडाग्राममध्ये ठिकठिकाणी लोखंडी तारा परसल्या असून, भिंतीतून पाणी झिरपत असल्याची तक्रार आॅस्ट्रेलियाच्या निरीक्षण पथकाने रविवारी आयोजकांकडे केली होती. आमचे खेळाडू येथे थांबणे शक्य नाही, अशीही त्यांनी धमकी दिली होती. आॅस्ट्रेलियाच्या आॅलिम्पिक पथकाच्या प्रमुख किटी चिलर म्हणाल्या, की आयोजन समितीने कामाची गती वाढविली. यावर आम्ही समाधानी आहोत. माझ्या मते बुधवारपर्यंत आमचे खेळाडू येथे दाखल होऊ शकतात. आम्ही आयोजकांकडे २०० समस्यांचा पाढा वाचला आहे. सफाईसाठी आम्ही स्वत:चे पैसे खर्च केले. आयोजक समिती हे पैसे परत करणार हेदेखील कोडे आहे.(वृत्तसंस्था)- अर्जेंटिना आॅलिम्पिक समितीचे प्रमुख गेरार्डो वेरथिन म्हणाले, की क्रीडाग्राममधील काही मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाली नसल्याची तक्रार आहे. आम्ही आॅलिम्पिक क्रीडाग्रामबाहेर आपल्या खेळाडूंची निवासव्यवस्था केली आहे. माझ्या खेळाडूंना देण्यात आलेल्या पाच मजली ब्लॉक्समधील कामे अद्यापही रखडलेली आहेत.