शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

गब्बरची अर्धशतकी खेळी

By admin | Updated: July 21, 2016 23:45 IST

वेस्ट इंडिजविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 50 षटकात 2 बाद 158 धावा अशी सुरुवात केली.

ऑनलाइन लोकमतअ‍ॅण्टीग्वा, दि. 21-  कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव यामुळे सतत टीकेचा धनी ठरत असलेला सलामीवीर शिखर धवन याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 50 षटकात 2 बाद 158 धावा अशी सुरुवात केली. आपल्या तुफानी खेळीमुळे गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या धवनने आक्रमणाला मुरड घालत अर्धशतक झळकावून विंडिजला दबावाखाली ठेवले.येथील सर विवियन रिचडर््स स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुरली विजय आणि शिखर धवन यांनी सावध भूमिका घेताना विंडिज गोलंदाजीचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. शॅनॉन गॅब्रीयल, कर्णधार जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी अचूक मारा करताना भारतीयांना जखडवण्यात यश मिळवले. गॅब्रीयल टाकत असलेल्या सातव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मुरली विजय ब्रेथवेटच्या हाती झेल देऊन परतला. विजय २६ चेंडूत एका चौकारासह केवळ ७ धावा काढून परतला. यानंतर धवनच्या सोबतीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने दमदार बचाव करताना विंडिज गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. विश्रांतीपर्यंत या दोन्ही फलंदाजांनी विंडिजला आणखी यश मिळवण्यापासून रोखले. मात्र, विश्रांतीनंतर लगेच फिरकीपटू देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर अनावश्यक फटका मारुन पुजाराने आपली विकेट अक्षरश: बहाल केली. पुजाराने ६७ चेंडूंचा सामना करताना १६ धावा काढल्या. यावेळी विंडिज वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. परंतु, कर्णधार विराट कोहलीने जम बसलेल्या धवनला योग्य साथ दिली. या दोघांनी संयम व आक्रमणाचा योग्य ताळमेळ साधत भारताचा धावफलक हलता ठेवला. धवन १२१ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ७३ धावांवर खेळत आहे. तर कोहलीने ५७ चेंडूत २ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद आहे. .........................................संक्षिप्त धावफलक : भारत (पहिला डाव) : ४५ षटकात २ बाद १३६ धावा (शिखर धवन खेळत आहे ७३, विराट कोहली खेळत आहे ३४, चेतेश्वर पुजारा १६, मुरली विजय ७; शॅनॉन गॅब्रीयल १/२९, देवेंद्र बिशू १/३४)