शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छ. शिवाजी महाराजांमुळेच मी मजबूत आहे

By admin | Updated: July 26, 2016 21:28 IST

२०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ : २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत. मला कोणी प्रायोजकही नसल्याने अनेकांनी मला बॉक्सिंग सोडण्याबाबत सल्ले दिले. मात्र मी त्यांचे ऐकले नाही. माझी नाळ ही मराठ्यांशी जोडली गेली आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी खूप प्रेरीत असल्यानेच मानसिकरीत्या मजबूत आणि जिद्दि आहे, असे वक्तव्य रिओ आॅलिम्पिकमध्ये ६४ किलोवजनी गटात भारताचे प्रतिनिधित्त्व करणारआ बॉक्सर मनोज कुमारने केले.

आॅलिम्पिकसाठी भारतीय संघातील सदस्य असलेला मनोज तब्बल सहा वर्षांपासून नोकरीतील बढतीच्या प्रतिक्षेत आहे. २०१० साली राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये तृतीय श्रेणीचा कर्मचारी असलेल्या मनोजला बढती देण्याबाबत आश्वासने देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी यांनी मनोजला आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे यानंतर सात मंत्र्यांनी हे पद सांभाळले, पण मनोजला मिळालेले आश्वासन पुर्ण झाले नाही.

नोकरीतील बढतीबाबत मी मुकुल राय यांच्यापासून विद्यमान मंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत सर्वांना पत्र लिहिले. प्रत्येकाने मला याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. शिवाय प्रायोजक मिळवण्यासाठी मी अनेक मोठमोठ्या कंपन्यांना पत्र लिहून कळवले. परंतु, त्यांना वाटले असेल की मी इतका पुढे जाऊ शकणार नाही. शिवाय माझ्याकडे माझ्याविषयी बोलणारे कोणीही नसल्याने ही गोष्टही माझ्याविरुध्दच गेली,ह्णह्ण अशी खंतही मनोजने यावेळी मांडली. यानंतरही बॉक्सिंग का सोडली नाही, यावर मनोज म्हणाला, ह्यह्यएक सेकंदपण मी असा विचार केला नाही. लोकांना चुकीचे ठरवण्यामध्ये खूप आनंद मिळतो. मी कोणाच्याही समर्थनाशिवाय आज यश मिळवले आहे. माझ्याकडे केवळ कोच आणि मोठा भाऊ राजेशची साथ आहे.