शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकमध्ये रशियाच्या सहभागाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 25, 2016 00:25 IST

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) ५ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये रशियाला सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतलुसाने, दि. २५  : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) ५ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये रशियाला सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. खराब डोपिंग रेकॉर्ड असला तरी रशियावर पूर्ण बंदी घालण्यात येणार नसल्याचे आयओसीने स्पष्ट केले.आयओसीने रशियन खेळाडूंबाबतचा निर्णय घेण्याचा अधिक विविध खेळांच्या क्रीडा महासंघांना दिला आहे. आयओसीच्या निर्णयामुळे रशियावर रिओ आॅलिम्पिकमधून बाहेर राहण्याचा धोका टळला आहे. आता रशियन खेळाडूंवर बंदी घालायची किंवा नाही याचा निर्णय क्रीडा महासंघांना घ्यायचा आहे. आॅलिम्पिक प्रारंभ होण्यास १२ दिवसांचा अवधी शिल्लक असताना या निर्णयामुळे आॅलिम्पिक आंदोलनाची दोन गटात विभागणी होण्याचे टळले आहे.

विश्व डोपिंग विरोधी एजन्सीच्या (वाडा) मॅक्लारेन अहवालानंतर रशियावर रिओ आॅलिम्पिकमध्ये बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. मॅक्लारेन यांच्या अहवालामध्ये रशियन सरकार खेळाडूंसाठी डोपिंग कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी २०१४ मध्ये सोच्ची येथे झालेल्या शीतकालीन आॅलिम्पिकचे उदाहरण देण्यात आले होते. आयओसीने या अहवानंतर रविवारी आपल्या १५ सदस्यांच्या कार्यकारी बोर्डाची टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करीत हा निर्णय जाहीर केला.

आयओसीने निर्णय घेतला की रशियन खेळाडूंना आॅलिम्पिकमध्ये सहभागी करण्याचा निर्णय त्या खेळांचे आंतरराष्ट्रीय महासंघ घेतील. वाडा मॅक्लारेनमध्ये ज्या रशियन अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सोमवारपासून प्रारंभ होईल.  खेळातील सर्वोच्च लवादाने रशियन खेळाडूंवर रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील अपील गुरुवारी फेटाळले.