शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार भारतीय उपांत्य फेरीत झुंजणार, आज शशी, अंकुशिता यांच्या कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:36 IST

भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत.

गुवाहाटी : भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत. ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा आणि नेहा यादव आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कडवे आव्हान मोडित काढून सुवर्णाकडे वाटचाल करतात काय, हे पाहणे रंजक ठरेल. एकूण दहा उपांत्य लढतींचा थरार सायंकाळी पाच वाजेपासून रंगणार आहे. बलाढ्य रशियाचे देखील चार बॉक्सर रिंगणात असतील. याशिवाय कझाकस्तानचे दोन तर चीन, मंगोलिया, थायलंड, तायपेई, आयर्लंड, जपान, पोलंड, तुर्कस्थान, इंग्लंड आणि व्हिएतनाम या संघातील प्रत्येकी एक बॉक्सर उपांत्य फेरीत नशीब आजमावणार आहे. सुदैवाने भारत आणि रशियाचे खेळाडू आज आमने- सामने नसतील.फ्लायवेट गटात ज्योतीला कझाकस्तानची अब्द्रायमोवा झांसाया हिचे आव्हान असेल. अब्द्रायमोवाने काल पदकाची प्रबळ दावेदार मानली गेलेली अमेरिकेची हेवन गार्सियावर मात केली होती. आक्रमक, चपळ आणि बुद्धिमान खेळाडू असलेल्या अब्द्रायमोवावर विजय मिळवायचा झाल्यास ज्योतीला सावध खेळावे लागणार आहे.फिदरवेट गटाच्या उपांत्य सामन्यात शशी चोप्रापुढे मंगोलियाची मोंघोर नामून हिचे तगडे आव्हान राहील. लाईट वेल्टर वेट गटात स्थानिक खेळाडू असलेली देशाची सर्वांत प्रतिभावान बॉक्सर अंकुशिता बोरो हिला थायलंडची साकेसरी थांचानोक हिच्याविरुद्ध उपांत्य सामना खेळायचा आहे.थाायलंडचे खेळाडू नजर चुकवून ठोसा मारण्यात पटाईत असल्याचे ओळखून भारतीय संघाचे मुख्य कोच राफेल यांनी या लढतीसाठी नवे डावपेच आखले आहेत. गुरुवारी झालेल्या संघाच्या सरावादररम्यान याची झलक पाहायला मिळाली. नेहा यादव ही चौथ्या उपांत्य सामन्यात ८१ किलोवरील गटात कझाकस्तानची इस्लामबेकोवा दीनाविरुदद्ध खेळेल. नेहाला स्पर्धेच्या सोडतीदरम्यान थेट उपांत्य फेरीपर्यंत पुढे चाल मिळाल्याने भारताचे पदक आधीच निश्चित झाले होते.>मी पदकांच्या नंबरवर नव्हे तर चांगल्या कामगिरीवर विश्वास बाळगतो. चांगली लढत दिली तर पदक येईलच. मी तर सात पदकांची अपेक्षा बाळगून आहे. स्वप्न साकार झााल्यास सर्वाधिक आनंद मला होईल. पण पदके नक्की जिंकू अशी आशा आहे. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडंूचे सर्व व्हिडिओ पाहून डावपेच आखले आहेत. मी खेळाडूला त्यांच्या कुवतीनुसार डावपेच शिकविले आहेत. उद्या त्यांना रिंगणात अंमलबजावणी करावी लागेल.- राफेल बर्गामास्को,हाय परफॉर्मन्स संचालक

टॅग्स :boxingबॉक्सिंग