सिंगापूर : माजी मलेशियन आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू थानासेगर एस सिनाइयाला मॅच फिक्सिंग प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली असून, त्याला कोर्टात हजर करण्यात आले. मलेशियन पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट जप्त केल्यानंतरही थानासेगर फरार झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. २०१२ मध्ये त्याला सिंगापूरविरुद्ध मलेशिया यांच्या फुटबॉलचा सामना सुरू असताना रेफरीला लाच दिल्या प्रकरणात अटक झाली होती.
माजी मलेशियन फुटबॉलपटूला पुन्हा अटक
By admin | Updated: August 12, 2014 01:34 IST