नवी दिल्ली : भारताच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल संघाला लिस्बनमधील सराव केंद्रात झालेल्या पहिल्या सामन्यात पोर्तुगालच्या व्हिक्टोरिया संघाकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज दिली. गोल नोंदविण्याची वारंवार संधी मिळाली पण मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका भारतीय खेळाडूंना नडल्या. व्हिक्टोरिया संघाने ३८ व्या मिनिटाला गोल नोंदविल्याने हा संघ मध्यांतरापर्यंत आघाडीवर होता. भारताकडून अंकित जाधवने पेनल्टीवर ६७ व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल नोंदविला. यानंतर भारताने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे ८५ व्या मिनिटाला व्हिक्टोरिया संघाने गोल नोंदविताच भारताने सामना गमावला. २५ एप्रिल रोजी भारताला दुसरा सराव सामना खेळायचा आहे.(वृत्तसंस्था)
१७ वर्षांखालील फुटबॉल - भारतीय संघ पराभूत
By admin | Updated: April 19, 2017 01:42 IST