शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले कालवश; कर्करोगाशी झुंज अखेर संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 07:45 IST

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

विक्रमी तीन विश्वचषक जिंकणारे ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. शतकातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले २०२१ पासून कोनल कॅन्सरवर उपचार घेत होते. काही आजारांमुळे ते गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते. त्यांचे एजंट जोए फ्रॅगा यांनी पेले यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पेले यांनी ब्राझीलला फुटबॉलच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. साओ पाउलोपासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासात ते या खेळाचे ग्लोबल एम्बेसेडरही बनले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यांनी ब्राझीलकडून ७७ गोल केले. नुकतेच विश्वचषकादरम्यान नेमारने त्यांच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली होती.

पेले यांचं पूर्ण नाव काय?पेले यांचे पूर्ण नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो होते. त्यांचा जन्म १९४० मध्ये झाला. फुटबॉलची लोकप्रियता शिखरावर नेण्यात आणि त्यासाठी मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात ते एक अग्रणी होते. भ्रष्टाचार, लष्करी उठाव, सेन्सॉरशिप आणि दडपशाही सरकारांनी वेढलेल्या देशात त्यांचा जन्म झाला. वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजेच १९५८ मध्ये त्यांनी विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलची प्रतिमा बदलली.

अशा प्रकारे आले चर्चेतस्वीडनमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पेले यांनी चार सामन्यांत सहा गोल केले, त्यापैकी दोन अंतिम सामन्यात झाले. ब्राझीलला त्यांनी यजमान संघावर 5-2 ने विजय मिळवून दिला आणि इथूनच त्यांचा चढता आलेख सुरू झाला. FIFA ने  महान खेळाडूंपैकी एक म्हणून सूचीबद्ध केलेले पेले हे राजकारण्यांचे देखील आवडते होते. १९७० च्या विश्वचषकापूर्वी ते ब्राझीलच्या सर्वात हुकूमशाही सरकारच्या सर्वात निर्दयी सदस्यांपैकी एक असलेले ब्राझीलचे अध्यक्ष एमिलियो गारास्ताझू मेडिसी यांच्यासोबत स्टेजवर दिसले होते.

टॅग्स :FootballफुटबॉलBrazilब्राझील