बर्मिंगहॅम : सय्यद मोदी ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावे करणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत आपला फॉर्म कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल़ या स्पर्धेत पी़ व्ही़ सिंधू, पी़ कश्यप, ज्वाला गुट्टा यांच्याही कामगिरीवर सर्वांची नजर असेल़ सायनाने नव्या सत्रात शानदार सुरुवात करताना लखनौमध्ये सय्यद मोदी ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटनच्या जेतेपदावर आपले नाव कोरले होते़ त्यामुळे ही अनुभवी खेळाडू आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करील़ दुसरीकडे, पुरुष गटातील एकेरीत कश्यपला कठीण ड्रॉ मिळाला आहे़ त्याला पहिल्या फेरीत सहावे मानांकनप्राप्त चाऊ टीएनचा सामना करावा लागेल.अन्य लढतीत चीन ओपन सुपर सिरीजचा किताब आपल्या नावे करणारा भारतीय बॅडमिंटनपटू के़ श्रीकांतसमोर पहिल्या फेरीत जपानच्या केंटो मोमोटाचे आव्हान असेल़ या स्पर्धेत अन्य भारतीय खेळाडू एच.एस. प्रणय, पी़ व्ही़ सिंधू, मुन अन्नी, बी़ सुमीत रेड्डी, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, आनंद पवार, अजय जयराम हे खेळाडूसुद्धा विशेष कामगिरी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील़ (वृत्तसंस्था)जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाने २०१० आणि २०१३ मध्ये आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती़ मात्र, तिला पराभवाचा सामना करावा लागला होता़ आतापर्यंत एकदाही आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले नाही़ त्यामुळे या वेळी स्पर्धेचा किताब मिळविण्याचे ठरविले आहे़ त्यासाठी आपल्या खेळावर विशेष मेहनत घेतली आहे़ नक्कीच मी स्पर्धेत सर्वोत्कृ ट कामगिरी करून दाखवीऩ- सायना नेहवालमात्र, यानंतर तिला चीनच्या यिहान वँगचा सामना करावा लागू शकतो़ यिहानविरुद्ध सायनाला विशेष कामगिरी करता आलेली नाही़ या चिनी खेळाडूंविरुद्ध ९ पैकी केवळ एकाच सामन्यात सायनाला विजय मिळविता आला आहे़2014मध्ये इंडिया ओपन, आॅस्ट्रेलिया ओपन, चीन ओपन स्पर्धांचा किताब नावेकेला होता.
फुलराणी सायना नेहवाल फॉर्म कायम राखणार?
By admin | Updated: March 3, 2015 02:01 IST