शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

फिक्सिंगचा खेळ खल्लास

By admin | Updated: July 16, 2015 08:46 IST

निवृत्त सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंबंधित चौकशीचा अहवाल मंगळवारी जारी करताच

नवी दिल्ली : निवृत्त सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंबंधित चौकशीचा अहवाल मंगळवारी जारी करताच आयपीएलच्या तंबूत अनिश्चिततेचे वादळ शिरले. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीने गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजन्म बंदी घातली असून, त्यांची मालकी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बाद केले आहे. या निर्णयाने दोन संघ कमी झाल्याने त्यातील खेळाडूंसाठी नव्या संघांचा पर्याय आणि आयपीएलची एकूणच रचना घुसळून निघणार आहे. अर्थात क्रिकेटवरील विश्वासाचा खेळ खल्लास करणाऱ्या फिक्सिंगची या निर्णयाने हिट विकेट गेली.न्या. लोढा यांच्या नेतृत्वाखालील समितीने आज भरगच्च पत्रकार परिषदेत हा निकाल सुनावला. लोढा समिती या दोन्ही संघांवर बंदी घालणार की मोठा आर्थिक दंड ठोठावणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. २०१३च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मयप्पन आणि कुंद्रा यांना सट्टेबाजीप्रकरणी दोषी ठरविले होते. त्यानंतर या दोघांसह त्यांच्या संघांना काय शिक्षा द्यायची, यासाठी न्या. लोढा यांच्या नेतृत्वात तीनसदस्यीय समिती नेमली. वर्षभर चौकशी केल्यानंतर लोढा समितीने मंगळवारी निकाल दिला. या समितीत लोढा यांच्यासह न्या. अशोक भान आणि न्या. आर. रवींद्रन यांचा समावेश होता. बीसीसीआय आणि आयपीएल नियमानुसार संघांचे मालक किंवा अधिकारी गैरप्रकारात दोषी आढळत असतील तर त्या संघाला बाद करण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर समितीने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली. ही शिक्षा तातडीने लागू झाली आहे. अनुत्तरित प्रश्न1) आयपीएलचे कसे होणार? 2) ‘टॉपप्लेअर’कोणत्या संघात खेळणार? 3)दोन्ही संघांतील खेळाडूंच्या पैशाचे काय? 4)बीसीसीआय नव्या संघांचा शोध घेणार का?4)पुणे, कोच्ची संघांना संधी मिळणार का?न्या. लोढा म्हणाले...‘‘मयप्पन सट्टेबाजीत गुंतला होता. नियमितपणे तो आयपीएलवर सट्टा लावायचा. त्याने ६० लाख रुपये गमावले. त्याने कमाई मात्र केली नाही, हे त्याचे दुर्दैव! तो ४० वर्षांचा आहे. या खेळावर त्याचे प्रेम आहे, हे मनाला पटण्यासारखे नाहीच.’’ निकालातील ताशेरे गुरुनाथ मय्यपन याला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांच्या प्रक्रियेसाठी आजीवन निलंबनमय्यपनला पाच वर्षांसाठी कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधील भागीदारीसाठी अयोग्य घोषित मय्यपनच्या सट्टेबाजीमुळे खेळाची, बीसीसीआय व आयपीएलची बदनामी झालीराजस्थान रॉयल्सच्या राज कुंद्रांनाही अशीच शिक्षा ठोठावली दोन संघ दोन वर्षांसाठी निलंबितचेन्नई सुपरकिंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सचे आयपीएलमधून २ वर्षांसाठी निलंबन.राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्जचे संघ दोन वर्षांसाठी निलंबित, कारवाई तत्काळ लागू चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांमधील खेळाडूंना अन्य संघांत सामावून घेणे शक्य होणार नाही. कारण तसे केल्यास पुन्हा उरलेल्या सहा संघांमध्ये प्रस्थापित खेळाडूंचाच भरणा होईल. म्हणजेच उदयोन्मुख खेळाडू या व्यासपीठापासून वंचित होतील. या परिस्थितीत दोन प्रमुुख शक्यता संभवतात.... आव्हान फक्त सुप्रीम कोर्टातन्या. लोढा समितीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानला जाईल. त्यामुळे याविरोधात कोणाला तक्रार करावयाची असल्यास ती फक्त सर्वोच्च न्यायालयातच करता येणार आहे. महेंद्रसिंग धोनीविना आयपीएल ही कल्पनाच करवत नाही. मुळात आठ संघांचा विचार करून आखलेल्या ढाच्यात दोन संघांची भर टाकण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात आता दोन संघ कमी झाले आहेत. सहा संघांच्या बळावर हा ढाचा टिकेल का, याचा विचार अपरिहार्य बनला आहे. - सुनील गावसकर