शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

फाईव्ह नेशन्स...वन गोल..!

By admin | Updated: October 6, 2016 04:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या १७ वर्षांखालील ‘ब्रिक्स’ फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी मोठ्या थाटात करण्यात आले.

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या १७ वर्षांखालील ‘ब्रिक्स’ फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी मोठ्या थाटात करण्यात आले. फाईव्ह नेशन्स...वन गोल ही स्पर्धा गीत घेउन आलेली ही स्पर्धा बांबोळी मैदानावर सुरु झाली. फुटबॉल हा गोवेकरांच्या हृदयात आहे. ब्राझील, चीन, भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेसाठी गोवा हे सर्वाेत्तम ठिकाण आहे, असे गौरोदगार केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी काढले. देशातील पहिल्या ‘ब्रिक्स’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया, केंद्रीय क्रीडा सचिव राजीव यादव, ब्रिक्स स्पर्धेचे सीईओ भल्ला, गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा तसेच इतर राज्यांचे मंत्री उपस्थित होते. यावेळी पार्सेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल केले. फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ आहे. या खेळाला अधिक लोकप्रियता मिळावी तसेच आगमी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेउत या स्पर्धेकडे अधिक गांभीर्याने पाहिल्या जात आहे. पाचही देशांना एकत्र आणण्याचे काम या खेळाने केले आहे. त्यामुळे खेळ हा एक नवा धर्म म्हणून पुढे येत आहे. ब्रिक्सची पहिली स्पर्धा गोव्यात होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. देशातील उदयोन्मुख खेळाडू पाहण्याची संधी गोवेकरांना मिळत आहे, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहनही पार्सेकर यांनी यावेळी केले. गोएल म्हणाले, मिशन इलेव्हन ही नवी संकल्पना आगामी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात आहे. केंद्र सरकारनेही फुटबॉल अधिक प्राथमिकता देण्याचे ठरविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)विश्वचषकापूर्वी होणारी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानल्या जात आहे. या स्पर्धेतून भविष्यातील युवा खेळाडू देशाला मिळतील. गोवा हे फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही स्पर्धा गोव्यात खेळविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. (क्रीडा प्रतिनिधी)