मयूरेशच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
मुंबई - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकस्मिक निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सातार्यात भेट घेऊन मयूरेशच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.खटाव तालुक्यातील मायणी येथील त्याच्या घरी जाऊन तावडे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास निधीतून ५ ...
मयूरेशच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
मुंबई - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकस्मिक निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सातार्यात भेट घेऊन मयूरेशच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.खटाव तालुक्यातील मायणी येथील त्याच्या घरी जाऊन तावडे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास निधीतून ५ लाख रुपयांची मदत त्यांनी घोषित केली व नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी मयूरेश पवारच्या नावाने सातारा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार सुरू करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले. तसेच, मयूरेशचा लहान भाऊ आकाश याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असेही त्यांनी जाहीर केले.मयूरेशसमवेत स्पर्धेसाठी गेलेला नेटबॉल खेळाडू व त्याचा मित्र गणेश चौधरी मयूरेशच्या मृत्यूने बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. तावडे यांनी त्याचीही भेट घेऊन त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञाकडून त्याचे काऊन्सेलिंग करण्यात येईल. गरज भासल्यास मुंबई अथवा पुणे येथे विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्याला हलवण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)